APMC NEWS IMPACT : मुंबई APMCत राजकीय फलक कायम बातमी दाखवल्यानंतर NMMC तुर्भे विभागांची कारवाई
 
- दोन तासात पाचही मार्केट मध्ये NMMC तुर्भे विभागांची कारवाई
- आचारसंहिता लागू होऊन सुद्धा राजकीय पक्षांच्या फोटो   फलकांवर   होते  
- मुंबई APMC फळ ,भाजीपाला ,धान्य मार्केटमध्ये राजकीय पक्ष्याचे फलक काढले
- विविध पक्ष संघटनांच्या कार्यालयांवर पक्षाचे नेत्यांच्या छबी असलेले नामफलकांवर कापड झाकण्यात आले
ANCHOR/VO : लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होताच नवी मुंबई शहरात   सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांसह नेत्यांच्या संपर्क कार्यालयांवरील पक्षाचे ध्वज काढण्यात आले. तर नामफलकांवर कापड झाकण्याची लगबग सुरू झाले होते ,मात्र मुंबई एपीएमसी भाजीपाला,फळ व धान्य मार्केट्मधे विविध राजकीय पक्षाचे अनधिकृत कंटेनर कार्यालयावर नेत्यांचे छबी असलेले नामफलकांवर कापड झाकण्यात आलेले नव्हता . एपीएमसी न्यूज डिजिटल चॅनेलने मंगळवारी प्रत्येक मार्केटची पाहणी केली आणि राजकीय पक्ष्याचे असलेले कंटेनर कार्यलयवर लावण्यात आलेल्या नामफलकच्या बातमी   दाखवली होती ,सदर बातमीच्या दखल घेऊन नवी मुंबई मनपाचे तुर्भे विभागातर्फे कारवाई करण्यात आली . भाजीपाला ,फळ ,धान्यमार्केट सह इतर मार्केटमधील अनधिकृत राजकीय पक्ष्याचे कार्यलयावर लावण्यात आलेल्या नामफलक व नेत्याचे छबी काढण्यात आली आहे, बाजार आवारात कुठल्याही अतिक्रमणवर कारवाई करण्याची   जवाबदारी बाजार समितीच्या प्रशासनाला असतो मात्र मार्केटच्या उप सचिव व मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संगणमताने हि सर्व अनागोंदी कारभार मार्केटमध्ये चालतो ज्याच्या बदनाम बाजार समितीला सतत होत आहे, यावर सचिव गांभीर्याने लक्ष दियाला   गरजेचे आहे