APMC News Impact : शरद जरे यांच्याकडून पणन संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढला!
कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्याकडे पणन संचालक पदाची जबाबदारी
ACB चौकशीच्या पार्श्वभूमीवर दोन महत्वाचे पदे कसे काय देण्यात आले ‘APMC News Digital’ने उपस्थित केले होते प्रश्न
नवी मुंबई : पणन संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे शरद जरे यांच्याकडून हा अतिरिक्त कार्यभार काढण्यात आला असून, त्यांच्या जागी कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ACB चौकशी सुरू असताना शरद जरे यांच्याकडे दोन महत्त्वाची पदे कशी देण्यात आली, असा सवाल ‘APMC News Digital’ने ३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तातून उपस्थित केला होता.
राष्ट्रीय महत्त्वाचे बाजार मुंबई APMCचे सचिव तसेच पणन संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार शरद जरे यांच्याकडे होता. ACBमार्फत चौकशी सुरू असताना त्यांच्याकडे ही दोन्ही महत्त्वाची पदे असल्याबाबत ‘APMC News Digital’ने प्रश्न उपस्थित केले होते.
यासोबतच मुंबई APMCमधील वसुली, महसूल, सेस, विविध शुल्क आणि बाजार समितीच्या प्रशासकीय कारभारातील कथित अनियमिततांबाबतही ‘APMC News Digital’ने सातत्याने वृत्तांकन केले आहे.
या वृत्तांची सहकार व पणन विभागाने दखल घेतल्याचे समोर आले असून, शरद जरे यांच्याकडील पणन संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढण्यात आला आहे. त्यांच्या जागी कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र, शरद जरे यांच्याकडे राष्ट्रीय महत्त्वाचे बाजार मुंबई APMCच्या सचिवपदाची जबाबदारी कायम असल्याची माहिती आहे.मात्र या महत्वाचे बाजारवर सक्षम अधिकारी नियुक्ती करण्याची मागणी बाजार घटकांकडून केली जात आहे.
ACB चौकशीच्या पार्श्वभूमीवर पणन संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढण्यात आल्याने या निर्णयाकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. दरम्यान, मुंबई APMCतील महसूल वसुली, सेस, विविध शुल्क आणि प्रशासकीय कारभारासंदर्भात ‘APMC News Digital’ने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर शासन स्तरावर पुढे काय कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.