मुंबई APMC फळ मार्केटमध्ये सिमरन फळाची दमदार एंट्री
Mumbai Apmc Simran Fruits : मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या   ‘सिमरन’ फळाची आवक सुरु झाली आहे. ग्राहकांना “सिमरन” फळाचे खास आकर्षण असल्याने फळ खरेदीसाठी फळ बाजारात गर्दी पहायला मिळत आहे.
सिमरन फळ
काश्मीर मधून सिमरन फळाचा हंगाम सुरु झाली असून या फळाचा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत असतो. हे फळ दिसायला साधारणतः टोमॅटो फळासारखे असून ग्राहकांचे मात्र खास आकर्षण ठरले आहे.सिमरन फळ चवीला गोड असल्याने खरेदीसाठी खवय्यांची चांगलीच गर्दी फळ बाजारात पाहायला मिळत आहे. हे फळ सुरवातीला हिरवळ आणि पिवळसर असते. पिकल्यावर ते लाल रंगाचे होत असून ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. तर हे फळ काश्मीर व शिमला येथून येत आहे . मार्केटमध्ये   काही मोजक्या व्यापाऱ्यांकडे या फळाची आवक येत असल्याने खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते.
मुंबई एपीएमसी बाजारात साधारण 1 ते 2 हजार बॉक्सची आवक होत आहे. या फळाचा एक बॉक्स अंदाजे बारा ते चौदा किलोचा असतो. घाऊक बाजारात त्याच्या एका पेटीला दर्जानुसार 1200 ते 1800 रुपये भाव मिळत आहे. आपल्याला हे फळ चाखायचे असल्यास आपण देखील एपीएमसी मार्केटमध्ये खरेदी करु शकता.