मुंबई Apmc होलसेल मार्केटमधे कांदा ,चिनची लसूणचे आवक व बाजार भाव
 
Mumbai Apmc Onion Market Bajarbhav : मुंबइ APMC होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या 114 गाड्यांमधून जवळपास 21 हजार 500 गोनी कांद्याची आवक झाली आहे. मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचा दर 15 ते 45 रुपये आहे, नवीन कांद्याचा दर 20 ते 45 रुपये आहे, तसेच सफेद कांद्याचा दर 30 ते 40 रुपये आहे. मार्केटमध्ये बटाट्याच्या 68 गाड्यांमधून 32 हजार गोनी बटाट्याची आवक झाली आहे.
  मार्केटमध्ये UPहून आलेल्या जुन्या बटाट्याचा दर 9 ते 14 रुपये आहे, मध्य प्रदेश मधून आलेल्या जुन्या बटाट्याचा दर 15 ते 23 रुपये आहे, तर गुजरात हून आलेल्या जुन्या बटाट्याचा दर 5 ते 17 रुपये आहे, तर नवीन बटाट्याचा दर 14   ते 18 रुपये आहे. मार्केटमध्ये आज लसणाच्या 08 गाड्यांमधून 1720 गोणी लासणाची आवक झाली आहे. मार्केटमध्ये उटीहून आलेल्या लसणाचा दर 120 ते 200 रुपये आहे. तर देशी   लसणाचा दर 80 ते 170 रुपये व गुजरात व up हून आलेल्या लसणाचा दर 60 ते 110 रुपये आहे . तर चायनाहून आलेल्या लासनाचा दर   150 ते 160 रुपये प्रतिकिलो आहे.