Big Breaking:मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधे पाला कचरा उचलणाऱ्या शेतकरी संस्थेचा अध्यक्षावर 5 राऊंड गोळीवार ,आरोपी फरार
नवी मुंबई : आताची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील सानपाडा स्टेशन जवळील डी मार्ट परिसरात आज सकाळी गोळीबाराचा प्रकार घडला आहे. शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजाराम टोके यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी 5 ते 6 राऊंड गोळीबार केला व ते तेथून फरार झाले. सध्या राजाराम टोके यांची स्थिती गंभीर असून त्यांच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Apmc प्रशासन व पणन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे हा गोळीबाराचा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. Apmc न्यूज डिजिटलने या पूर्वी देखील पाला -कचरा उचलण्यावरून या ठिकाणी गँग वार होण्याची शक्यता असल्याची बातमी दाखवली होती, आणि आता ते सिद्ध झालं आहे.
भाजीपाला मार्किट मधे अनाधिकृतपणे शेतमलाची व्यापार करणारे लोग येणाऱ्या शेतमालातून गळ्यावर शूटिंग करतात त्या मधून निघणारे कचरा धक्केवर टाकला जातोय ,यावर या पूर्वी सुद्धा ३ गुटात हाणामारी झाला होत यांच्या दाखल Apmc पोलिसांनी घेऊन सदर पाला कचरा उचलणारे अनधिकृत लोकांना बंदी करा नाही तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होणार यांच्या पत्रा सुद्धा साचवांना दिले होते मात्र ते बंद झाली नाही , टोके याना अधिकृतपणे कचरा उचलायचे परवानगी पणन विभाग कडून दिला होता ,त्याच बरोबर टोके यांनी बाजार समितीच्या भ्रष्टाचारवर शेकडो Rti टाकला होता .आता पोलिस तपासांनंतर माहिती समोर येणार आहे