BIG BREAKING | ‘अहमदनगरचं नाव आता….’, देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा
मुंबई : पुण्यश्लोक अहिव्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगरच्या चौंडी येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना राम शिंदे यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याची मागणी केली. गोपीचंद पडळकर यांनीदेखील याबाबत मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अहमदनगरचं नाव अहिल्यानंगर होणार, अशी मोठी घोषणा केली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील याबाबत घोषणा केली. तसेच आपल्या सरकारच्या कार्यकाळात अहिल्यानगर नाव होणं हे आमचं भाग्य आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
“राजमाता अहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी राहिली नसती. त्या नसत्या तर शिवाची मंदिरं आपल्याला दिसली नसती. त्या नसत्या तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आमचा धर्म आज जीवंत आहे, तो धर्म आज जीवंत नसता. अशा प्रकारचं कार्य या राजमातेने करुन दाखवलं. त्यामुळे जी मागणी होतेय की, या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिलं पाहिजे, मी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विनंती करणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आपलं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. आपण छत्रपती शिवरायांचं नाव सांगणारे लोकं आहोत. आपण तुमच्याच नेतृत्वात संभाजीनगर तयार केलंय, आपण धाराशिव तयार केलंय. आता तुमच्याच नेतृत्वात मुख्यमंत्री महोदय अहिल्यानगर झालं पाहिजे. मला विश्वास आहे, छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे. तर अहिल्यानगर होणारच. तुमच्या मनात शंका ठेवण्याचं कारण नाहीय”, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.