Big Breaking | मुंबई APMC येथे अत्ती धोकादायक कांदा बटाटा मार्केट मधील सज्जा कोसळले
Mumbai Apmc Onion Market आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई Apmc कांदा बटाटा होलसेल मार्केट मधील दोन गाळ्यांच्या समोर शेतमालाची विक्री होणाऱ्या जागेवर सज्जा व पत्राचे शेड   कोसळले आहेत. कांदा बटाटा मार्केट २० वर्षा पासुन नवी मुंबई महापालिकाने अत्ती धोकादायक घोषित करुणसुद्धा या गाळ्यावर व्यापार सुरु आहे. दोन दिवसापासून   दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अत्ती धीकदायक कांदा बटाटा मार्केट मधील   जर्जर गाळ्याच्या समोर   सज्जा कोसळला आहे. सोमवारी रात्री आठच्या   सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही जर ह सज्जा दिवसा कोसळला असता तर या ठिकाणी मोठी जीवित हानी झाली असत. सज्जा पडून १२ तास झाले आहेत मात्र कार्यकारी अभियंता व मार्केट अभियंत्याने घर सोडले नाही त्यामुळे बाजार घटक नाराज झाले आहेत.
मुंबई Apmc कांदा बटाटा मार्केटचे माजी संचालक अशोक वाळूंज यांचे गाळे F/129,वाळुंज ट्रेंड्स व F/130,मानस ट्रेंड्स या गाळयाचे   समोर सज्जा व पत्राचे शेड कोसळले आहे. मार्किट संचालक व Apmc प्रशासन यांच्या भोंगळ कारभारामुळे आज मार्केटमधील २७२ गाळे धारक २० वर्षा पासुन अत्ती धोकादायक गाळ्यावर व्यापार करण्यासाठी मजबूर आहेत.
जोरदार पावसात जर्जर गाळ्याचा   सज्जा कोसळल्याने महापालिका आणि Apmc प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे . मार्केटमधे   जवळपास २७२ गाळे आहेत आणि जवळपास ५०० व्यापारी ,माथाडी कामगार आणि ग्राहक मिळून दिवसात हजारो लोकांची ये जा असते. त्यामुळे २० वर्षापासून अत्ती धोकादायक गळ्यावर व्यापार करणाऱ्या व्यापारी ,माथाडी कामगार आणि ग्राहकांची सुरक्षेचा   प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे   व्यापार सर्व अत्ती धोकादायक गाळ्यावर होत आहे. यावर   महापालिका प्रशासन लवकरात लवकर कारवाई करावी जेणे करुन मोठा अनर्थ टळेल अशी मागणी बाजार घटक करीत आहे.