BIG BREAKING | समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचा छापा, मुंबईतील सर्वात मोठी बातमी
मुंबई : मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे.  एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे. एनसीबीच्या रिपोर्टनंतर सीबीआयकडून ही कारवाई केली जात आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचारादेखील गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
समीर वानखेडे यांच्या विरोधात चौकशी करण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली होती. ही टीम सविस्तर तपास करत होती. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं क्रूझ ड्रग्स प्रकरण, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावायाचं प्रकरण आणि आणखी असे काही प्रकरणं होती. त्या प्रकरणांप्रकरणी टीमकडून चौकशी करण्यात आली. या टीमने समीर वानखेडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला होता.
संबंधित अहवालाच्या आधारे सीबीआयने प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरात छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. ही छापोमारी आणखी किती ठिकाणी सुरु आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण सीबीआयचं एक पथक समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरी झाडाझडती घेण्यासाठी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून छाननी केली जातेय.