Big Breaking: मुंबई APMC मासला मार्केटमध्ये अग्नितांडव - 12 तास होऊन देखील आग आटोक्यात नाही , अवैध गोडाऊन दुर्घटनांना कारणीभूत
Mumbai Apmc Masala Market Fire: आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे . मुंबई एपीएमसी   मासला मार्केट मध्ये आग लागली आहे .हि आग रविवार रात्री ३ वाजता लागली असून ११ तास होऊन देखील अद्याप हि आग विझली नाही .
मसाला   मार्केट मधील h विंग गळा नंबर २३ कुलस्वामी फूड्स मध्ये रविवारी रात्री ३   च्या सुमारास हि घटना घडली. त्याठिकाणी   गाळ्याच्या वरच्या भागात काजू, बदाम अक्रोड पिस्त हा सुका   मेवा व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साठवण्यात आला   होता. हि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडथळे येत आहेत. गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्याचा साठ असल्याने आग अधिक भडकून मोठ्या प्रमाणत धूर निघत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीती पसरली आहे.
सूत्राने सांगितल प्रमाणे रात्रीच्या वेळी   गळ्यावर प्रोसेसिंग सूरु असल्याने आग लागली आहे. आता पर्यन्त आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनच्या १३ गाड्या दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत   आहेत   . आगीमध्ये कोणीही जखमी झालेले नसून गाळ्यांमधील अनधिकृतपणे साठा करून ठेवण्यात आलेल्या ड्राईफ्रुट्स मुळे हि आग लागली आहे .मसाला   मार्केट मधील h विंग गळा नंबर २३ कुलस्वामी फूड्स मध्ये रविवारी रात्री ३   च्या सुमारास हि घटना घडली. त्याठिकाणी   गाळ्याच्या वरच्या भागात काजू, बदाम अक्रोड पिस्त हा सुका   मेवा व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साठवण्यात आला   होता. सूत्राने सांगितले प्रमाणे रात्रीच्या वेळी या गळ्यावर पाकिंग सुरु होति त्यामुळे आग लागली आहे .जर हि आग दिवसा लागली असती तर मोठ्याप्रमाणात जीवितहानी झाली असति. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या वाशीसह सर्वच अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले. ११ तास होऊन देखील 
आग आटोक्यात आली नाही. व्यापारी गाळ्यांच्या पोटमाळ्यावर देखील साहित्य असल्याने, प्रत्येक गाळ्याच्या वरच्या भागावर जाऊन पाण्याचा मारा करावा लागत होता. परंतु संपूर्ण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात साठवण्यात आलेल्या साहित्यांमुळे अग्निशमन जवानांना आग वीजवण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे. वारंवार APMCप्रशासानानाला पत्र देयून सुद्धा सचिव आणि उप सचिव लक्ष्य देत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात मोठी जीवितहानी होऊ शकते.