BIG BREAKING :मुंबई ,पुणे ,नागपूर ,नाशिक बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्यासाठी शासनाच्या वेगाने हालचाली सुरू

-मुंबई APMC संचालक मंडळाची 17 मार्च होणार शेवटची सभा ? अधिवेशन संपल्यावर संचालक मंडळ होणार बरखास्त ?
-अधिवेशनानंतर अध्यादेश काढत राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या मोठ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याच्या जोरदार हालचाली
*‘मी संचालक’अशे म्हणणारे मुंबई APMC संचालक मंडळाच्या बाजार उठणार ?
मुंबई : मुंबई APMC संचालक मंडळाची 17 मार्च रोजी प्रशासकीय इमारतीत होणाऱ्या सभा शेवटचे असल्याची बोलले जात आहे ,कारण अधिवेशनानंतर अध्यादेश काढत राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या मोठ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. नविन सुधारणांनुसार या बाजार समित्यांवर अस्तित्वात असलेले संचालक तत्काळ मंडळ बरखास्त होणार आहेत. बाजार समिती मधे राजकीय लोकांच्या हस्तखेप राहणार नाही त्यामुळे संचालक मंडळाच्या पाया खालची वाळू सरकले आहे .मी संचालक अशे म्हणणारे मार्केट संचालकाला परिस्थिती " न घर का न घाट का" अशी होणार आहे .
शेतमाल पणन सुधारणांमधील सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देणारी सुधारणा राज्यपालांच्या सहीने 2018 मध्ये मंजूर करण्यात आली होती. मात्र यानंतरच्या काळात या विधेयकाला विरोध होत सुधारणांची प्रक्रिया थांबविली होती. आता पुन्हा या प्रक्रियेला सुरूवात झाली. विधानसभा निवणुकांनंतर नविन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षमंत्री दादा भुसे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह कृषी आणि पणन सचिवांची नियुक्ती केली आहे. गुरूवारी समितीबाबत शासन निर्णय निघताच शुक्रवारी याबाबत बैठक घेत आढाव घेण्यात आला.
या समित्यांवर आता शासन नियुक्त 23 जणांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्तीची शिफारस जुन्या विधेयकात होती. यामुळे आता पणनमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखालील समिती कोणत्या सुधारणा सुचविते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
संचालक मंडळ होणार तातडीने बरखास्त
राज्य शासनाने राष्ट्रीय नामांकित बाजार तळाची अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर लगेच विद्यमान बाजार समिती कार्य करणे बंद करील आणि सर्व विद्यमान समिती सदस्य हे आपले पद धारण करणे बंद करतील असे २०१८ च्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सुधारणांनंतर पुणे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त होण्याची चिन्हे आहेत
मागील ५ वर्षापासून या संचालक मंडळानी मार्केटच्या विकास कामेकडे दुर्लक्ष्य केले आहे . मार्केटमधील शौचालय घोटाळा ,FSI घोटाळा , मार्केट मधून शेतकरी ,प्रामाणिक व्यापारी आणि माथाडी कामगारांना हद्दपार ,बाजार आवारात अनधिकृत बांधकाम करून त्यावर राहण्याची आणि व्यापार करण्याची सोयी ,फुटपाथवर अतिक्रमण करून मार्केट मधे गुटखा. दारू ,गांजा आणि अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांना पाठिंबा देणे ही सर्व या संचालक मंडळाला महाग पाडण्याची बोलले जात आहे . तसेच मार्केटच्या पुनर्विकास रखडले आहे .ही बाब शासनाने गांभीर्याने घेतली असून आता या संचालक मंडळच्या बाजार उठणार असे बोलले जात आहे .