BIG BREAKING | मंत्री उदय सामंत यांच्या बोटीचा मांडवा येथे अपघात
नवी मुंबई : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित दुर्घटना ही मांडवा येथे घडली आहे. मांडव्यात उदय सामंत यांची बोट जेटीत धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बोटीवरील सर्वजण सध्या सुखरुप असल्याची माहिती समोर येतेय. बोटीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात झाला अशी चर्चा आहे. पण ही घटना नेमकी कशी घडली याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली नाही.