Big Breaking: भ्रष्टाचारी अधिकारी व काही संचालकांमुळे मुंबई APMC कलंकीत!
-मुंबई APMC मधील टेकू अभियंताच्या भोंगळ कारभार ,15 वर्षापासून एकाच ठेकेदारावर मेहरबानी
-मुंबई APMC प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया न राबविता मर्जीतील कंत्राटदारला कामे
-अतिधोकादायक गाळ्यावर टेकू लावण्यासाठी अनुभवी एजेंसी आवश्यक
-पावसाळ्यात मार्केट कोसळून जीवीत किंवा वित्तहानी झाल्यास जबाबदार कोण ?
-भ्रष्टाचारी अधिकारी व काही संचालकामुळे मुंबई APMC   कलंकीत
-मार्केटमध्ये रस्ते , गटार ,सेस झोल ,टेकू ,अवैध व्यापार , अतिक्रमण घोटाळे आघाडीवर
-मुंबई मनपा च्या धर्तीवर APMCतील   घोटाळ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौकशी करणार का ?
Mumbai Apmc मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून अत्यावश्यक   कामे दाखवून निविदा प्रक्रिया न राबविता आपल्या मर्जीतील कंत्राटदारला कामाची दर पत्रिका मागवून काम वाटप करून बाजार घटकाचे   कोट्यवधी रुपये वाया घालविणारी मुंबई APMC   ही राज्यातील पहिली बाजार समिती आहे, बाजार घटकांनी   कररूपाने भरलेल्या पैशांची अभियंता विभागाकडून बेसुमार उधळपट्टी सुरू आहे,   PWD च्या नियमावलीनुसार नको ते काम मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटचे टेकू अभियंता करत आहेत . अति धोकादायक गाळ्यावर टेकू लावण्यासाठी अनुभवी एजेंसी   असणे आवश्यक असते परंतु मार्केट मध्ये १५ वर्षापासून मर्जीतील ठेकेदाराला काम दिले जात आहे . त्यामुळे मुंबई महापालिकेच्या धर्तीवर APMCतील   घोटाळ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौकशी करणार का ? याकडे बाजार घटकांचे लक्ष लागले आहे
अति धोकादायक कांदा-बटाटा मार्केटमधे 7 दिवसापूर्वी   रात्री स्लॅब कोसळला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या दुर्घटनेमुळे मार्केटच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात मार्केट कोसळून जीवीत किंवा वित्तहानी झाल्यास जबाबदार कोण, अशी विचारणा केली जात आहे मात्र दुसरीकडे २० वर्षापासून अति धोकदायक झालेल्या गाळ्याच्या पॅसेज आणि धाक्यावर परत   टेकू लावण्यात येत आहे ,मार्केट मधे या पूर्वी देखील टेकू लावण्यात आले होते   .हे टेकू लावण्यासाठी जवळपास २ ते ३ कोटी रुपये बाजार समितीच्या तिजोरीतून   खर्च झाले आहेत तरी सुद्धा मार्केट सुरक्षित नाही ,जेवढा खर्च बाजार समितीने टेकू लावण्यामध्ये खर्च केला त्यामध्ये एका विंगच्या दुरुस्तीचे काम झाले   असते मात्र टेकू अभियंत्याने ते केले नाही.   ,मार्केट मधील व्यापारी म्हणतात   आम्हाला दुरुस्ती करण्यासाठी परवानगी द्या मात्र मार्केट अभियंता ऐकत नाहीत. यामुळे बाजार समितीत   अनेक गैरप्रकार घडल्याची शक्यता आहे. कांदा बटाटा मार्केट मध्ये रस्ते ,ड्रेनेज लाईन ,डिव्हायडर ,दुरुस्ती ,टेकू मध्ये मार्केट अभियंताने   केलेली कामे आदींची चौकशी करावी. कोट्यवधी खर्चून केलेल्या कामांचा बाजार समितीला सेस देणाऱ्या बाजार घटकांना   काय फायदा झाला, हे संचालक मंडळ व APMC   प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणी काही व्यपाऱ्यानी केली आहे .