BIG BREAKING: NMMC आयुक्त एक्शन मोडवर; मुंबई APMC मार्केटमधील अती धोकादायक इमारतीच्या पाणी पुरवठा खंडीत.
नवी मुंबई : मुंबई Apmc मार्केट मधून एक मोठी बातमी समोर येत आहे .नवी मुंबई महापालिकेने अती धोकादायक असलेल्या   मुंबई Apmc कांदा बटाटा मार्केट, मसाला मार्केटच्या मध्यवर्ती इमारत ,mafco मार्केट सह मुंबई Apmc प्रशासकीय इमारतीतील पाणी   खंडित केला आहे . अती धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी Action घेतली आहे. सदर कारवाई नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे विभागतून करण्यात आली आहे.
अती धोकादायक असलेल्या कांदा बटाटा, मसाला व मॅफको मार्केटमध्ये वारंवार स्लॅप कोसळल्याच्या घटना या पूर्वी घडल्या होत्या, दोन दिवसांपूर्वीच प्रशासकीय इमारतीतील सचिव पी. एल. खंडागळे यांच्या खुर्चीवर देखील स्लॅप कोसळले होते, गेली अनेक वर्षे या मार्केटमधील धोकादायक इमारतीतील गाळे धारकांना गाळे खाली करण्याकरिता नोटिस पाठवण्यात येत होती, मात्र तरीदेखील तेथे खरेदी विक्री सुरूच होती, त्यामुळे आता पावसाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
मात्र महत्वाची बाब अशी की उद्या म्हणजेच 20 जून रोजी भाजीपाला मार्केटमध्ये नवनियोजित खासदार नरेश म्हसके यांचा स्वागत समारंभ पार पडणार आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार नरेश म्हसके प्रचारासाठी मार्केटमध्ये दौरा करत होते, मात्र निवडणुकीनंतर काहीच दिवसात मार्केटमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्याच्या मार्केट भेटीत खासदार नरेश म्हसके याबाबत काय निर्णय घेणार या कडे सर्व बाजारघटकांचे लक्ष लागले आहे.