Big Breaking: मुंबई Apmc सचिवांच्या दालनात स्लॅब कोसळले ;सुदैवाने जीवितहानी टळली
नवी मुंबई : मुंबई Apmc मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सचिव पी. एल. खंडागळे यांच्या केबिनमधील खुर्चीवर स्लॅप कोसळल्याची दुर्घटना घडली आहे, ही दुर्घटना सोमवारी संध्याकाळी घडली,तसेच सुट्टीचा दिवस असल्याने सुदैवाने यात सचिव बचावले व कोणतीही जीवितहानी झाली नाही. जर ही घटना इतर दिवशी कार्यालयीन वेळेत घडली असती, तर मात्र मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. मुंबई कृषि उत्पन्न बाजारसमितीचे हे मुख्यालय 20 ते 25 वर्षे जून झाले असले तरीही, या इमारतीमध्ये डागडुजीच्या नावाखाली मुख्यालय अभियंत्याकडून लाखों रुपये खर्च करण्यात येत आहेत. याच इमारतीमध्ये आमदार, खसदारांपासून मंत्रालयातील अधिकारी ते सर्व नेत्यांची ये जा असते, येथे महत्वाच्या बैठकी पार पडतात.
राज्यातील मुख्य बाजार समितींचे कामकाज मुंबई Apmc मुख्यालयातून चालते, या मुख्यालयात राज्याच्या विविध बाजार समिती मधून शेतकरी प्रतिनिधी येतात.या मध्ये सभापतींसह   संचालक मंडळ,प्रशासकीय अधिकारी व सचिव असतात, तसेच या मुख्यालयात बसलेले अधिकारी कर्मचारी सुद्धा आपला जीव मुठीत घेऊन काम करतात. या मुख्यालयाच्या कामकाजाची जबाबदारी असलेला बोगस अभियंता जवळपास १५ वर्षापासून एकाच जागेवर ठाण मांडून बसला आहे, त्यामुळे मार्केट खड्यात गेलं आहे. मात्र ज्या बोगस अभियंतावर कारवाई करायला हवी, त्याच अभियंत्यला सर्व संचालक व सचिव सोबत घेवून फिरतात.