मुंबई Apmc होलसेल मार्केटमधील किरकोळ व्यापार त्वरित बंद करा, नाहीतर MNS Style ने उत्तर देण्यात येईल .
 
मुंबई Apmc भाजीपाला होलसेल मार्केटमधील एकाच मार्केटमध्ये भाजीपाल्याला दोन दर
होलसेल मार्केटमध्ये किरकोळ व्यापार केला जात असल्याने ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण
mumbai apmc होलसेल मार्केट मधील पणन संचालकांनी लेटर देऊन सुद्धा कारवाई नाही
मुंबई Apmc होलसेल मार्केटमध्ये पणन संचालकांनी लेटर देऊन सुद्धा किरकोळ व्यापार कारवाई नाही
नवी मुंबई: मुंबई Apmc भाजीपाला होलसेल मार्केटमधील एकाच मार्केटमध्ये भाजीपाल्याला दोन दर आकारले जात असल्याने शेतकरी आणि ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात अहे. तसेच होलसेल मार्केटमध्ये मोठय प्रमाणावर किरकोळ व्यापार केला जात असल्याने ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.   बाजार समिती प्रशासनाक्डून   प्रसिद्ध केला जाणारा बाजार भाव आणि व्यापाऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालामध्ये बऱ्याच प्रमाणात तफावत दिसून येत आहे. यामध्ये शेतकरी ग्राहक आणि बाजार समिती प्रशासनाला मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची बातमी apmc newsडिजिटलने दाखवल्या नंतर राज्याच्या पणन संचालकांनी सदर बातमीची दाखल घेऊन बाजारसमिती प्रशासनाला खुलासा मागणारे पत्र पाठवले होते पण या पत्रास बाजार समिती प्रशासनाने पणण संचालनाला दिशाभूल करणारी उत्तरे दिली आहेत. यामध्ये असे दिसून येत आहे की मुंबई apmc प्रशासन शेतकरी व   ग्राहकांसाठी नसून व्यापाऱ्यांसाठी काम करत आहे. भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये अवैध किरकोळ व्यापार व बाजार भावात तफावति वर त्वरित कारवाईची   मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे.
मुंबई apmc प्रशासनाने होलसेल मार्केटमध्ये होणारा किरकोळ व्यापार तात्काळ थांबवावा आणि या बाजार भावातील तफावतीत कुठल्या संचालक किंवा अधिकारी यामध्ये सामील आहेत हे लवकरात लवकर शोधून काढावे, जेणेकरून शेतकरी, ग्राहक व बाजार समितीला नुकसान होणार नाही. अन्यथा मनसे style ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा   या वेळी शिंदे यांनी दिला आहे.