सभापती अशोक डक यांनी पाहणी दौऱ्यातून फिरवली बदल्यांची भाकरी - मर्जीतील उप सचिवांना क्रीम पोस्टिंग.
Mumbai Apmc officers transfer: मुंबई   कृषी उत्पन्न बाजार समितीत ८ महिन्या नंतर संचालक मंडळाची सभा झाली ,संचालक मंडळावर   अपात्रतेची टांगती तलवार आणि न्यायालयाची लढाईमुळे मार्केटमध्ये ८ महिन्यापासून एकही सभा झाली नव्हति. मात्र ३ ऑगस्ट रोजी   घेण्यात आलेल्या सभेमध्ये मार्केटची विकासकामे सोडून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सुरुवात केल्याने बाजार समिती प्रशासनात मोठी उलथापालथ सुरु झाली आहे. दुसरीकडे   या सर्व बदल्यामध्ये मोठा प्रमाणात अर्थकारण झाल्याचा   गंभीर आरोप माजी संचालक राजेंद्र पाटील यांनी केला आहे.
मुंबई कृषी उत्पन बाजारसमितीचे कार्यवाहू सभापती अशोक डक यांनी पावसालापुर्वी   कामा संदर्भात दोन महिन्यांपूर्वी कांदा बटाटा, भाजीपाला व धान्य मार्केटचा पाहणी दौरा केला होता. मात्र या पाहणी दौऱ्यात कांदा बटाटा मार्केट सोडून भाजीपाला व धान्य मार्केटच्या उपसचिवांच्या कार्यालयात पाहणी दौरा केला   होता. डक यांच्या पाहणी दौऱ्यानंतर जे कामे झाली ते खानापूर्ती झाल्याची माहिती व्यापाऱ्याने दिली होती , मात्र या पाहणी दौऱ्यानंतर काही दिवसात डक यांनी   मार्केट संचालक सोवत चर्चा झाल्यावर तिन्ही मार्केटमधून अधिकारी व कर्मचाऱ्याची बदलीवर   भाकरी   फिरवल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्याच्या नंतर आठ अधिकारी व कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली आहे ,सर्वात जास्त सेस देणारे मार्केटमधे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याना नियुक्ती दिल्याने काही अधिकारी व संचालक खूश तर काही नाराज झाल्याची चर्चा बाजार आवारत सुरू आहे .
सभापती अशोक डक यांनी काही संचालक सोवत घेवून पहिल्या टप्यात ८ अधिकारी व कर्मचार्याची बदली करण्यमधे यशस्वी झाले आहे, मात्र सदर बदली अधिकाऱ्यावर   आलेल्या तक्रारी नंतर करण्यात आल्याची माहिती काही संचालकांनी दिली आहे. तर दुसरीकडे जवळपास   ५ ते १५ वर्षांपासून एकाच ठिकाणी तळ ठोकून बसलेल्या काही   अधिकाऱ्याची बदली होत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  
संचालक मंडळाने विविध महत्त्वाच्या जागांवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना ‘क्रिम पोस्टिंग’तर प्रामाणिकपणे काम कारणाऱ्या अधिकाऱ्यांना   ‘साइड पोस्टिंग,’मध्ये ठेवले आले आहे . जे संचालक मंडळाला खुश करणार त्यांना मलईदार मार्केट मिळणार असा पॅटर्न सध्या मार्केटमध्ये रोवण्यात येत आहे.
मुंबई APMC मार्केट मधील सर्वात जास्त सेस देणार मार्केट, हे मसाला व धान्य मार्केट आहे. या मार्केटच्या सेसवर इतर मार्केटची विकासकामे व कर्मचाऱ्याच्या पगार अवलंबून असतो, या मार्केटमध्ये येण्यासाठी अधिकारी व कर्मचारी राजकीय वजन वापरून ,दबाव टाकतात. सूत्रानीं सांगितल्याप्रमाणे काही शेतकरी प्रतिनिधी सर्व अधिकाऱ्याची माहिती गोळा करतात आणि त्या अधिकाऱ्यांसोबत वन टु वन चर्चा करून नंतर सेटलमेंट करतात, त्यासाठी काही मार्केट संचालक व कर्मचारी साथ देतात , त्यामुळे मार्केटची विकासकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून त्यासाठी हे मंडळ कारणीभूत आहे,   मार्केटमध्ये कोट्यवधी रुपये सेस भरून सुद्धा बाजार घटकांना मूलभूत सुविधांपासून वंचीत   राहावं लागतं आहे.
त्यामुळे बदल्यांमध्ये होत असलेली ही सौदेबाजी व दलाली कधी थांबणार अशी चर्चा बाजार आवारात सुरु आहे
बाजार समितीमध्ये जवळपास २० ते ३० अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत,त्यामुळे मसाला व धान्य मार्केट मधील उप सचिवाची पदे रिकामी झाली होती, त्यासाठी धान्य मार्केटमध्ये प्रभारी उप सचिव म्हणून मारुती पवितवार यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांच्या जागी   के .बी सावळकर याना चार्ज देण्यात आला होता. तर मसाला मार्केट मध्ये विजय शिगाडे याची नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे अनेकांना या बदल्या अडचणीच्या ठरल्या आहेत. काही अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील संचालकानां खुश केलं नाही त्यामुळे   तीन महिन्यात धान्य व मसाला मार्केटमधील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे या बदल्यांमुळे दोन महिन्यांपूर्वी कार्यवाहू सभापती अशोक डक यांचा पाहणी दौरा हां चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे बाजार घटक सांगतात सध्या मार्केट राम भरोसे चालले आहेत .
बदल्या पुढीलप्रमाणे -
- के .बी सावळकर   - भाजीपाला मार्केट मधून आता (मसाला मार्केट )
-व्ही . एस .राठोड -कांदा बटाटा मार्केट मधून आता ( धान्य मार्केट )
-विजय शिंगाडे -मसाला मार्केट मधून ( वसुली सखा ,नियमन .अनुज्ञप्ती )
-जी .ए .शिंपले - ( कांदा बटाटा ,लेखा शाखा )
-मारुती पवितवार -धान्य मार्केट मधून आता ( भाजीपाला मार्केट ,आस्थापना ,अतिरिक्त भाजीपाला )
-बी .जी टावरे   - प्रभारी सहायक सचिव ( मसाला मार्केट ,कांदा बटाटा मार्केट )
-रफिक इनामदार -मसाला मार्केट मधून आता ( प्र .सहायक सचिव वसुली शाखा ,नियमन ,अनुज्ञप्ती )
-आर .एल .शेळके -प्र .सहायक सचिव ( भाजीपाला व फळ मार्केट )