CM साहेब, आमच्या मार्केटकडे लक्ष द्या, मुंबई APMC व्यापाऱ्यांचे मागणी
Mumbai Apmc Market:एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें   (Eknath Shinde)ठाणे-नाशिक महामार्गाची पाहणी करताना दिसून आले.   रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर शिंदे यांनी सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ खड्डे दुरस्ती व रस्त्यावर पाणी न साचण्यासाठी आवश्यक ति कामे करण्याच्या सूचना दिल्या, मात्र दुसरीकडे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई apmc मार्केटकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं लक्ष कधी जाणार? असा प्रश्न बाजार घटक विचारत आहेत. मुंबई apmc कांदा बटाटा , मसाला व धान्य मार्केटमध्ये काही वर्षांपासून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने सर्व रस्त्यांवर खड्यांच साम्राज्य पसरल आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा वाहतूककोंडी होऊन व्यापारी, कामगार व ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कांदा बटाटा मार्केट २० वर्षांपासून अति धोकादायक घोषित करूनसुद्धा ते टेकुच्या सहाय्याने उभं आहे. त्यामुळे बाजार घटकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजीपाला मार्केटमधील अनधिकृत शेतमालाचा   व्यापारामुळे बाजारभावात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने शेतकरी आणि ग्राहक अडचणीत आले आहेत, याकडे पण लक्ष द्यावे. त्यामुळे या सर्व गोष्टी नियंत्रणात आणून बाजार समितीचा विकास करावा अशी मागणी बाजार घटक मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या कडे करत आहेत.