मुंबई APMC फळ मार्केटमध्ये देशासह परदेशी फळांना मागणी वाढली
 
Navi Mumbai : मुंबई APMC फळ मार्केटमध्ये देशी फळांसह परदेशी फळांना चांगलीच मागणी वाढली आहे. तर ग्राहक देखील या फळांना पसंती देत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. बाजारातील हि परदेशी फळे ग्राहकांचे खास आकर्षण ठरली आहेत. त्यामुळे ग्राहकांनी फळ खरेदीला गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. शिवाय विविध देशांमधून हि फळे बाजारात येत असल्याने परदेशी फळ खरेदीचा आनंद ग्राहक घेत आहेत. सध्या आंबा हंगाम सुरु झाला असून हापूस, पायरी, लालबाग आणि बदाम असे विविध आंबे बाजारात विक्रीसाठी आले आहेत. इराणी सफरचंद, इजिप्त संत्री, पॅकम पेयर, रासबेरी तर टर्की वरून खास गुणकारी फणस बाजारात आले आहे. रसाळ आणि मधुमेहासाठी हे फणस गुणकारी असल्याने परदेशी फणसाला अधिकच मागणी असल्याचे व्यपाऱ्यांनी सांगितले. तर इराणी सफरचंद 110 ते 130 रुपये प्रतिकिलो, हापूस आंबा 800 ते 1200 रुपये डझन, कर्नाटक आंबा १५० ते २०० रुपये किलो , संत्री ३० ते ४५,पेरू ४० ते ५५ ,पपई   २५ ते ३५,मोसंबी ४० ते ५०,केळी ४० ते ५०,चिकू २० ते २५ रुपये , डाळिंब ८० ते १३० रुपये किलो, इजिप्तचे संत्री ८० रुपये किलो, पॅकम पेयर १५० ते १८० रुपये किलो, द्राक्ष ६० ते ८० रुपये किलो, काळे द्राक्ष   ६० ते ८० रुपये किलो, कलिंगड २५ ते १८ रुपये ,अंजीर ८० ,किलो   दराने विकले जात आहे.
परदेशी फळ बाजार भाव
टर्की ,वॉशिंग्टन ,इराण सफरचंद १८० ते २२० रुपये किलो ,पियर १२० ते १४०, चिली च्या लाल द्राक्ष्य ४०० रुपये किलो ,इजिप्त संत्री १०० ते १२०, आवाकडू २५० ,केबी इराण २०० रुपये किलो ,ब्लूबेरी भारत १००० रुपये किलो दराने बिकला जात आहे