मुंबई APMC फळ मार्केटमध्ये देशासह परदेशी फळांना मागणी वाढली!
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये देशी फळांसह परदेशी फळांना चांगलीच मागणी वाढली आहे. तर ग्राहक देखील या फळांना पसंती देत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. बाजारातील हि परदेशी फळे ग्राहकांचे खास आकर्षण ठरली आहेत. त्यामुळे ग्राहकांनी फळ खरेदीला गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. शिवाय विविध देशांमधून हि फळे बाजारात येत असल्याने परदेशी फळ खरेदीचा आनंद ग्राहक घेत आहेत. सध्या आंबा हंगाम सुरु झाला असून हापूस, पायरी, लालबाग आणि बदाम असे विविध आंबे बाजारात विक्रीसाठी आले आहेत. इराणी सफरचंद, इजिप्त संत्री, पॅकम पेयर, रासबेरी तर टर्की वरून खास गुणकारी फणस बाजारात आले आहे. रसाळ आणि मधुमेहासाठी हे फणस गुणकारी असल्याने परदेशी फणसाला अधिकच मागणी असल्याचे घाऊक व्यापारी शिव कुमार यांनी   सांगितले. हापूस आंबा ६०० ते १००० रुपये डझन, कर्नाटक हापूस आंबा   ५० ते ८० रुपये किलो ,   इराणी सफरचंद १०० ते १२० रुपये प्रतिकिलो,साऊथ आफ्रिका   सफरचंद रॉयल गाला   १९० ते २५० ,टर्की सफरचंद   १६० ते १९० . , चिकू २० ते २५ रुपये डझन, डाळिंब ५० ते १३० रुपये किलो, इजिप्तचे संत्री ५० ते ६०   रुपये किलो, पॅकम पेयर १३०   ते १५० रुपये किलो,परदेशाच्या चिली द्राक्ष ३२० ते ३५० किलो,नाशिक   द्राक्ष ४० ते ६०   रुपये किलो, रासबेरी १५० रुपये किलो, काळे द्राक्ष ५० ते ७०   रुपये किलो, कलिंगड २० रुपये किलो तर फणस ११० रुपये किलो दराने विकले जात आहे.