मुंबई APMC फळ मार्केटमध्ये मधुमती खरबूज आणि हिमाचल चेरीला मागणी
 
APMC फळमार्केट मध्ये मधुमती खरबूज दाखल
उन्हाळ्यात खरबूजच्या मागणीत वाढ
खरबूज १५-२० रु. किलो तर मधुमती खरबूज ७० रु. किलो
काश्मीर चेरी पेक्ष्या हिमाचलची चेरीच्या मागणीत वाढ
नवी मुंबई: उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने अंगाची लाही लाही होत असते. अशा वेळी शरीराला थंडावा मिळावा म्हणून खरबूज खावे. खरबूज हे शीतफळ म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यात घाम येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीर डिहायड्रेटेड होण्याचा धोका असतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी समतोल राखण्यासाठी खरबूज खावे. खरबुजात उत्तम पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यासाठी ते चांगले फळ मानले जाते चला तर मग जाणून घेऊयात मुंबई apmc फळ मार्केट मधील खरबूज चे प्रकार आणि दर खरबूज १५ ते २० रुपये आणि मधुमती नावाचा   खरबूज बाजारात दाखल झाला असून दर ७० रुपये किलो आहे . त्याचबरोबर चेरी हि लहान मुलांपासून मोठ्याना देखील आवडते सध्या बाजारात हिमाचल आणि काश्मीर वरून चेरी दाखल झाली आहे. हिमाचल चेरीची बी छोटी असते त्यामुळे हि चेरी खायला उत्तम याचे दर ४०० ते ७०० रुपये किलो तर काश्मिरची चेरी १५०-३०० रुपये किलो ने विकली जात आहे.