मुंबई APMCतील जीर्ण पाण्याची टाकी बनली धोकादायक*
मुंबई APMC मार्केट दोन ,सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग (भूत बंगला )परिसरात 24 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पाण्याचा टाकीचा घोळ
APMC प्रशासनातर्फे कोट्यवधी रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधून वापर विना पडून आहे
मुंबई APMCच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांची डला मारणारे ‘ते ‘ प्रशासन कोण ? पाहा APMC News डिजिटल चॅनेलचा स्पेशल रिपोर्ट
Dangerous water tank in Mumbai Apmc Market : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मसाला मार्केट जवळ असलेल्या मध्यवर्ती सुविधा इमारत क्रमांक दोन (भूत बंगला )च्या बाजूला जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडण्याची मागणी महापालिकाकडे बाजार घटकांकडून केली जात आहे. सदरील टाकी जीव घेणार का? असा प्रश्न बाजार घटक करीत आहेत. धान्य आणि मसाला मार्केटमधे पाणीपुरवठा करण्यासाठी Apmc प्रशासनाने सदरील टाकी 24 वर्षांपूर्वी बांधली होती. परंतु सदर पाण्याची टाकीचा वापर आता पर्यंत झाली नाही .त्यामुळे या टाकीचे बांधकाम उखडले गेले असून ती खिळखिळी झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी ही टाकी कोसळण्याची शक्यता बाजार घटक व्यक्त करीत आहेत. टाकी कोसळली तर मसाला मार्केटच्या मुख्य रस्ता तसेच टाकीखाली व जवळ मर्चंट चेंबरमधे खरीदीसाठी येणाऱ्या ग्राहकाचा विनाकारण जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सर्वात महत्वाची बाब असी आहे की मध्यवर्ती इमारतीच्या खालच्या सर्व भाग सिडको मालकीचा आहे . या परिसरात बाजार समिती प्रशासनाने वर्ष 2000 ला जवळपास 2 कोटी रुपये खर्च करून भव्य पाण्याची टाकी बांधली होती . ज्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे सदर जागा बाजार समितीच्या मालकीचा नसून सिडकोचा आहे . सूत्राने सांगितलं प्रमाणे ज्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे यांच्या सिडको या महापालिकेच्या रिकॉर्ड मधे सुद्धा नोंद नाही . बाजार समिती प्रशासनाने टाकी बांधण्यापूर्वी जागेची व बांधकामाची परवानगी न घेता टाकी उभा केल्याची माहिती सूत्राने सांगितलं आहे . त्यामुळे सदर पाण्याची टाकी 24 वर्षापासून धुळखात पडलेले आहे .सदर टाकी कधी पण कोसळू शकता . त्यामुळे महापालिका व सिडको प्रशासन सदर पाण्याची टाकी तोडून जागे मोकळे करावी आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे .