अक्षय तृतीया आणि रमजान ईद दोन्ही सण एकाच वेळी आल्यानं आंब्याला मोठी मागणी
नवी मुंबई : अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) शुभमुहूर्ता वरती मुंबई   एपीएमसी फळ मार्केटमधे आंबे (Mango) खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळतेय. आज (Mumbai APMC) मार्केट   मधे कोकणातली जवळपास १२ ते १५ हजार   आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. तसेच तब्बल ५० हजारांपेक्षा जास्त आंब्याच्या पेट्या या कर्नाटक राज्यातून आलेल्या पाहायला मिळत आहेत. घाऊक बाजारात   हापूस आंब्याला ५०० ते १००० रुपये प्रति डझन असा दर भेटत आहे. कर्नाटक आंबा १०० रुपये किलोने विक्री होत आहे.मात्र   आजच्या शुभ मुहूर्ता वरती आंबे खरेदीसाठी आलेले   ग्राहकांना हापूस अंबाचा नावाने कर्नाटकी आंबा मारला जातो   . अक्षय तृतीया बरोबर रमजान ईदही आल्याने आंबा खरेदीत वाढ झाली आहे.
देवगड किंवा रत्नागिरी हापूसच्या   नावाखाली दक्षिण भारतातून येणाऱ्या कमी प्रतिच्या आंब्यांची   विक्री करण्याचे प्रमाण मुंबई एपीएमसी फळ मार्केटमधे   वाढीस लागले आहे. मुंबई Apmc प्रशासनतर्फे ग्राहकांची फसवणूक होउ नये यासाठी परिपत्रक काढण्यात येत आहे मात्र रात्रीच्या वेळी अधिकारी व कर्मचारी नसल्याने मार्केटमधे कर्नाटक आंबा वर केमिकल फवारणी करून देवगड अंबाच्या पेट्यात अदलाबदली केला जात आहे यावर अन्न औषध प्रशासन व Apmc प्रशासन कडक कारवाई करावी अशी मागणी बाजारघाटक करीत आहे
हापूस आंब्याला डझनला ५०० ते १००० रुपयांचा दर
आज अक्षय तृतीया शुभ मुहूर्त असल्यानं लोकांकडून आंबा खरेदीला महत्व दिलं जात आहे. आंबा घेण्यासाठी सकाळीच लोक फळ मार्केटमध्ये आले आहेत. मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, सध्या आंबा महाग मिळत आहे. सद्या एपीएमसीमध्ये 60 ते 65 हजार आंबा पेटी येत आहे. यामध्ये कोकणातील हापूसच्या फक्त 15 ते 18 हजार पेट्या येत आहेत. राहिलेला आंबा दक्षिण भारतातून आवक होत आहे. कोकणातील हापूस कमी येत असल्यानं दरही वाढले आहेत. सद्या 500 ते 800 रुपये डझन हापूस आंबा विकला जात आहे.