मुंबई APMC संचालक मंडळाच्या सभेच्या अगोदर सभापतींच्या निवडणूक घ्या -हायकोर्ट
 
मुंबई APMC सचिव व संचालकक मंडळ न्यायालयाला देतात चुकीची माहिती
३ आगस्ट रोजी संचालक मंडळाची   सभा होणार की पुढे जाणार?   संचालक मंडळ संभ्रमात
मुंबई APMC सचिवांनी कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून सभा घेण्याचे परिपत्रक काढले
सभा बेकायदेशीर असल्याची संचालक राजेंद्र पाटील यांचे वकिल संतोष यादव यांची माहिती
Mumbai Apmc Director Crisis: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेश भुसारी यांनी ३ आगस्ट रोजी होणाऱ्या   सदस्य समितीच्या   सभेसाठी परिपत्रक काढले आहे. या सभेमध्ये बाजार समितीच्या विकास कामांची १६ विषय सूची ठेवण्यात आली   आहे. सदर सभा सभापती अशोक डक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.सचिव राजेश भुसारी यांच्या म्हणण्यानुसार सदरची सभा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे होत आहे , मात्र न्यायालयाने जे आदेश दिले त्यात   आधी सभापती व उप सभापतींची निवडणूक करा नंतर सभा घ्या ,मात्र सचिवांनी कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून सभा घेण्याची परिपत्रक काढले आहे ,त्यामुळे सचिव राजेश भुसारी सभा घेण्या अगोदर सभापती व उप सभापतीची निवडणूक घेणार कि न्यायालयाची अवमानना करणार ? दुसरीकडे ३ आगस्ट रोजी होणारी हि सदस्य समिती सभा बेकायदेशीर असल्याची माहिती बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांचे वकिल adv संतोष यादव यांनी दिली आहे पाहूया या रिपोर्ट मध्ये
महाराष्ट्रा कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६३ कायदा २५ (१) आणि (२)   नुसार जेव्हा निधनाने किवा राजीनाम्याने पद रिक्त होते त्यानंतर शक्य तितक्या लवकर सभापती आणि उपसभापती ची निवड होणे आवश्यक असते त्यामुळे या सभेत सभापती आणि उपसभापती यांची निवड होणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त होइल अशी कायद्यामध्ये तरतूद आहे ,तसेच   मुंबई उच्च न्यायालयाने जे आदेश पारित केले आहेत   त्यामध्ये पण सांगितलं आहे की निवडूक लावा नंतर सभा घ्या.असे असताना देखील आता मुंबई apmc चे सचिव राजेश भुसारी कायद्याचा विरोधात जाणार की सभापती ,उप सभापती निवडणूकीनंतर सभा घेणार याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष लागले आहे