मुंबई APMC मार्केटमधे दोन मुख्य सुरक्षा अधिकारी असून सुद्धा मार्केट असुरक्षित कसे ?
नवी मुंबई : आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरक्षेच्या विषयावर ,या मार्केटमधे कशी चालते सुरक्षा व्यवस्था पाहूया एपीएमसी न्यूज बातमीच्या   खास रिपोर्ट मधे ….
आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच मार्केट आहेत. कांदा बटाटा ,भाजीपाला ,मसाल व धान्य व फळ या पाचही मार्केटच्या देखभालीसाठी सुरक्षा महामंडळाकडून जवळपास २६३   तर बाजार समिती प्रशासनातर्फे १६   सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. सदर 277 कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी २ मुख्य सुरक्षा अधिकारी सि.टी.   पवार आणि के.के रासकर यांची बाजार समिती प्रशासनाने नेमणूक केली   आहे. या सुरक्षा     अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बाजार समिती प्रशासनातर्फे कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.
मात्र या पाचही मार्केटमध्ये नेमणूक असलेल्या सुरक्षा विभागच्या हलगर्जीपणामुळे बाजार आवारत चोरी ,गुटखा ,गांजा ,अवैधपणे गाड्यांची   पार्किंग ,अवैधपणे पॅसेज ,धक्क्यावर शेतमालाची विक्री व फुटपाथवर अतिक्रमणाची संख्या वाढू लागली आहे .त्यामुळे येणाऱ्या काळात मार्केट असुरक्षित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येथील मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याना Apmc प्रशासन दर महिन्याला लाख रुपये पगार देते. मात्र लाख रुपये   पगार घेवून सुद्धा काम मात्र शून्यच दिसून येत आहे. मार्केटमध्ये 279 सुरक्षा अधिकारी व कर्मचारी असून सुद्धा मार्केट राम भरोसे सुरू आहे,   त्यामुळे मार्केटच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या अधिकाऱ्यांमुळे बाजार आवारत असलेले सुरक्षा अधिकारी व कर्मचारी आपली कर्तव्य   न   बजावता विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह   मार्केट संचालक व अधिकाऱ्याच्या मागे पुढे करताना दिसतात. संबंधित कर्मचाऱ्याने चुकीचे काम केल्यास ज्यावेळी त्याच्यावर कारवाई करण्यात येते, त्यावेळी मंत्रालयापासून आमदारापर्यंतचे त्या अधिकाऱ्याना फ़ोन येतात त्यामुळे चुकीचे काम करून सुद्धा ते बिनधास्तपणे मार्केटमध्ये वावरतात. याचा सर्वात जास्त फटका हा   भाजीपाला व फळ मार्केटला बसत आहे .या मार्केटमधे बाजार समितीचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे .शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या या बाजार समितीमधून शेतकरी ,प्रामाणिक व्यापारी व माथाडी कामगार हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे .
मसाला ,धान्य ,फळे व कांदा बटाटा मार्केटमधे सुद्धा चोरीचे प्रमाण वाढले आहे .मसाला मार्केटमध्ये   मागील 15 दिवसात 2 वेळा चोरीचा प्रकार घडला आहे.   तसेच काही दिवसापूर्वी क्राईम ब्रँचने एका घरफोडी करणाऱ्या गुन्ह्याच्या आरोपींना पकडले आहे त्यामधील एक आरोपी दिवसा हमाली करायचा व रात्री वाहेर घरफोडी करुन फळ व भाजीपाला मार्केटमधे वास्तव करायचा. या लोकांचे मार्केटमधे कुठल्याही प्रकारचे रेकॉर्ड उपस्थित नाही .त्यामुळे आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे .अन्न औषध प्रशासनाने २ वर्षात १० वेळा अवैध पान टपऱ्यांवर कारवाई करून देखील बाजार समिती प्रशासन त्या टपऱ्या पुन्हा चालू करण्यासाठी परवानगी देत आहे .त्यामुळे कारवाई करुन सुद्धा मार्केटमधे आज पण विन्धास्तपणे गुटखा व्यवसाय सुरु आहे .तसेच ही सर्व बाब सभापती व मार्केट संचालक याना माहिती असून सुद्धा त्या सुरक्षा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्यानं पाठिंबा दिला जात आहे . प्रशासनाने सुरक्षा अधिकाऱ्यांची बदली न करता त्यांची वरचा पदावर नेमणूक करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. एकीकडे Apmcच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कित्येक वर्षापासून रखडलेली पदोन्नती होत नाही, तर दुसरीकडे सुरक्षा विभागला पदोन्नती देण्यासाठी शिफारस केली जात आहे. त्यामुळे बाजार आवारत कित्येक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या या सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करून इतरांना संधी देण्यात यावी, अशी मागणी बाजार आवारात होऊ लागली आहे .