मुंबई APMCचे तत्कालीन प्रशासक सतीश सोनी यांचा भोंगळ कारभार उघडकीस; निविदा न काढता ६ कोटीच्या कामाची मंजुरी
नवी मुंबई : मुंबई एपीएमसी फळ मार्केट मध्ये निविदा न काढता जवळपास ६ कोटी रुपयांचा नाल्यावर   बांधण्यात आलेल्या पुल वापर विना पडुन राहिला आहे, या पुलामध्ये मोठा प्रमाणत आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा बाजार आवारत सुरू आहे.
मुंबई Apmc फळ मार्केट मध्ये बांधण्यात आलेल्या बहुउदेशीय इमारतीमधून आत-बाहेर जाण्यासाठी महापालिकेच्या नाल्यावर दोन ठिकाणी पुल तयार करण्यात आला, मात्र या पुलाचे काम होऊन देखील   रहदारीसाठी हा पूल अजून खुला करण्यात आलेला नाही. तुर्भे वाशी मार्गाला लागून असलेल्या नाल्याच्या दिशेलाही नाल्यावर पूल तयार करून गेट ठेवण्यात आलेलं आहे.   नाल्यावरील पूल तयार असून त्या ठिकाणी कुणी येऊ जाऊ नये म्हणून या नाल्यावर पत्रे लावून रस्ता बंद करण्यात आलेला आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे पूल उभारण्याचा खर्च ही वाया गेला आहे. त्यामुळे बाजार घटकाना मार्केटमधे ये जा करण्यासाठी   वळसा घालून बाजारात जावे लागत आहे, किंवा बाजारात प्रवेश करण्यासाठी आणि बाजारातून बाहेर पडण्यासाठी सर्वाना द्राविडी प्राणायाम करावा लागत आहेत. विशेष म्हणजे रहदारीसाठी पूल खुला नसल्याने, या ठिकाणी पुलावरच आता वाहन पार्किंग होऊ लागली आहे. त्यामुळे हा पूल नक्की कशासाठी उभारला आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे .त्यामुळे आता तरी बाजार समिती प्रशासनाने   रहदारीसाथी पुल सुरु करावी अशी मागणी बाजार घटकांनी केली आहे.
सदर पूल ४ वर्षापासून विना वापर पडून राहिला आहे. २०१७ ते १९ च्या दरम्यान सदर बांधकाम करण्यात आले होते, महत्त्वाची बाब अशी, की सदर बांधकामसाठी एपीएमसी प्रशासन कडून कुठल्याही प्रकारची   निविदा काढण्यात आली नाही .विना निविदा ४   वर्षांपूर्वी जवळपास ६ कोटी रुपये खर्च करून सदर पूल बांधण्यात आला, मात्र या बांधण्यात आलेल्या या पुलावर कुठलीही वाहने ये-जा करू शकत नाहीत, गाडी सहज पलटी होण्याची शक्यता आहे. . मुंबई apmc च्या अकुशल अभियान्त्यांमुळे बाजारसमितीचे वाटोळे झाले आहे, तत्कालीन प्रशासक सतीश सोनी व कार्यकारी अभियंता रमेश खिसते यांच्या कार्यकाळात सदर पूल बांधण्यात आला होता,   पुलाचे काम होऊन ४ वर्ष झाली.   यामध्ये सतीश सोनी ,शिवाजी पाहीणकर,अनिल चव्हाण ,अधिक्ष्यक अभियंता विलास वीरदार ,कार्यकारी अभियंता रमेश खिस्ते, उप अभियंता मोहन भापकर यामध्ये सेवानिवृत्त झाले.
त्यामुळे पुलावर झालेला खर्च व सदर कामाची चौकशी करुन सेवानिवृत्त झालेले प्रशासक व अभियंत्यांवर कारवाईं करण्याची मागणी बाजार घटक करत आहेत.   त्यामुळे नवीन आलेले सचिव यावर काय कारवाई करणार याकडे सर्व बाजार घटकांचे लक्ष्य लागले आहे.