मुंबई APMC मार्केट मधील होणाऱ्या वाहतूक कोंडी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी पाचही मार्केटच्या गेटवर लागणार “FASTAG” फास्टॅग
Mumbai Apmc News :मुंबई Apmc प्रशासकीय इमारतीत सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी आमदार शशिकांत शिंदे व सचिव पी .एल खंडागळे यांच्या उपस्थित बाजार समिती मधील अडी अडचणी सोडवण्यासाठी तसेच मार्केटच्या उत्पन्न वाढीसाठी पाचही मार्केट व मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती ,सदर   बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या   अडीअडचणी सांगितल्या, यामधे बाजार समितीच्या आस्थापनावर कंट्राटपद्धतीने कर्मचाऱ्यांचा विरोध ,अनावश्यक कामे करून कोट्यवधी रुपयाची खर्च ,नवीन भरती करण्याऐवजी शासनाकडून बाजार समिती मधे अधिकाऱ्यांना पर सेवेवर आणा जेणे करून बाजार समितीचे कामकाज सुरळीत होईल ,तसेच मार्केट मधे होणाऱ्या वाहतूक कोंडी होऊ नये यावर सुद्धा चर्चा करण्यात आली .
 
टोलणक्या सारखेच आता बाजार समितीच्या पाचही मार्केटच्या सर्व गेटवर बॅरिकेट आणि फ़ास्ट टॅग सिस्टिम लावण्याची मागणी अधिकारी व कर्मचाऱ्यातर्फे यावेळी करण्यात आली. या यंत्रणेमुळे बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होऊन वाहतूक   सुरळीत होण्यास मदत होईल असे अधिकारी व कर्मचाऱ्यातर्फे सांगण्यात आले. यावर आमदार शशिकांत शिंदे व सचिवांनी   लवकरात लवकर ही   यंत्रणा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.