मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये एफडीएची कारवाई. 4 पान टपऱ्या सिल प्रतिबंधित गुटखा जप्त, 4 जण ताब्यात
 
-भाजीपाला मार्केट संचालक ,प्रशासन व सुरक्षा अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने चालतो अवैध व्यापार
-FDA तर्फे पान टपऱ्या सिल केला जातो तर दुसरीकडे Apmc प्रशासनतर्फे   पान टपऱ्या सुरू करण्याची   परवानगी दिला जातो
-FDA व APMC प्रशासनाच्या अभद्र युतीमुळे बाजार आवारात गुटख्याचा व्यवसाय जोरात
-अन्न औषध प्रशासनाच्या   कारवाई दिखावा
-मुंबई APMC प्रशासनाचा अजब गजब कारभार , २५ हजार भरा   पान   टपऱ्या सुरु करा.
नवी मुंबई: अन्न औषध प्रशासनातर्फे मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील आज पान   टपर्यांवर कारवाई करण्यात आली असून ४ जनांना ताब्यात घेयात आले आहे.   या मध्ये त्यांच्या दुकानात सापडलेला हजारो रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला आणि इतर तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले असून चारही पान शॉप चालवणाऱ्या चालकांना अटक करुन त्यांचे पान शॉप सिल केले आहेत. एकीकडे अन्न औषध प्रशासन पान टपऱ्यावर कारवाई करतात तर   दुसरीकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मालमत्ता विभाग सील केलेल्या पान टपऱ्या पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी देत आहे त्यामुळे बाजार समितीच्या कारभार बदल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे .
मुंबई एपीएमसीतील   पाचही मार्केट मध्ये   जवळपास १३०   पान टपऱ्या असून यामधील   १०० टपऱ्यामंध्ये गुटखा विक्री बिनधास्त पणे होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . यामध्ये वाटप करण्यात आलेल्या पान तपऱ्या एकही मूळ मालक चालवत नसून भाडे तत्त्वावर दिले आहे .मार्केट मधे संचालक व सुरक्षा अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने ही सर्व चालवला जात असल्याची चर्चा बाजार आवारत सुरु आहे . सदर पान टपऱ्या मालमत्ता विभागाच्या देखरेखीखाली सुरु आहेत . अन्न औषध प्रशासनातर्फे   दोन वर्षात जवळपास ४० ते ५० पान टपर्यांवर कारवाई करण्यात आली होती.   अन्न औषध प्रशासन कारवाई करून सुद्धा बाजार समितीचे मालमत्ता विभागाने २५ हजार दंड घेऊन परत पान टपऱ्या सुरु करण्यासाठी परवानगी देत   आहे.   त्यामुळे अन्न औषध प्रशासन व एपीएमसी प्रशासननाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. सदरची   कारवाई   केवळ दिखावा असल्याची चर्चा बाजार आवारात सुरु आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे संपूर्ण नवी मुंबई परिसरात नशाबंदी अभियान सुरु आहे. मात्र मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गुटखा आणि नशेचे पदार्थ बिनधास्तपणे विकले जात आहेत. आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उप्तन्न बाजार समितीमध्ये दररोज हजारो लोकांची वर्दळ असते. मार्केटमध्ये जवळपास १० ते २० गोणी गुटख्याचा खप असून शौचालय, मार्केटमधील विविध विंगमध्ये गुटखा विक्री केली जात आहे. संपूर्ण नवी मुंबईत जेवढा गुटखा विकला जात नाही, तेवढा गुटखा एपीएमसी परिसरात विकला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मार्केटमध्ये   जवळपास 10 ते 15 हजार परप्रांतीय कामगार आणि किरकोळ व्यापारी अनधिकृतपणे राहत असल्याने सर्वात जास्त गुटखा विक्री येथे होत आहे. एपीएमसी पोलीस व अन्न औषध प्रशासन विभागाकडून वारंवार एपीएमसी प्रशासनाला पत्र देउन सुद्धा यावर कारवाई होत नाही.