शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्यास बँकांवर FIR दाखल करणार - देवेंद्र फडणवीस यांनी थेट बँकावाल्यांना तंबीच दिली…
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर बोलत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर बोलत बँकवाल्यांना थेट तंबीच दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना शेत शिवार योजना, शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज, आणि बँकातून दिल्या जाणाऱ्या कर्जावर बोलताना सांगितले की, शेतकऱ्यांना शिवसेना-भाजपचे सरकार हे सगळ्या प्रकारची मदत करण्यास तत्पर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटासमोर खचून न जाता शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आपल्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे म्हणून अॅग्रीकल्चर फिडरचा सोलरिझेशन करण्यात येत आहे.
त्याची सुरुवात 2018 सालीही करण्यात आली असून त्याची सुरुवात राळेगणसिद्धीपासून यशस्वीपद्धतीने करण्यात आली आहे.मध्यंतरी ही योजना कागदावर होती मात्र आता ती योजाना पुन्हा नव्याने सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना सांगत देवेंद्र फडणवीस यांनी नव्या योजनांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्वावर घेण्यात येणार असून एकरी 50 हजार रुपये प्रतिवर्षी जमीन तीस वर्षाकरिता घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कृषी कर्जाकरिता सिबिलची अट लागू होत नाही हे शॉर्ट टर्म कर्ज असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नसतील तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार कायम उभा असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आता पुन्हा एकदा सांगतो आहे की, शेतकऱ्यांना बँक कर्ज देत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या सूचना देणार असून हे आता खपवून घेतले जाणार नाही अशी तंबीच त्यांनी बँकांना दिली आहे.