आधी 25 कोटींच्या वसूलीचा, आता 30 लाखांचे घड्याळ चोरल्याचा आरोप; समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ
मुंबई : एनसीबीचे मुंबई झोनचे माजी डायरेक्टर यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. आर्यन खानप्रकरणी 25 कोटीच्या वसूलीच्या प्रकरणी वानखेडे यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता नवं प्रकरण समोर आलं आहे. एका विदेशी नागरिकाने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ब्रिटीश नागरीक करण सजनानी याने हा आरोप केला आहे. छापेमारीच्यावेळी समीर वानखेडेंनी मला अटक केली. यावेळी अधिकारी आशिष रंजन यांनी माझी 30 लाखांची रोलेक्स डेटोना घड्याळ चोरली. माझ्याकडून जप्त करण्यात आलेल्या सामनातही ती घडी दिसली नाही, असं करण सजनानी यांनी म्हटलं आहे.
आरोपानंतर समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एनसीबीची एक टीम आधीच त्यांच्याविरोधात महागड्या घड्याळ्यांची खरेदी आणि विक्रीची चौकशी करत आहेत. ही घड्याळ त्यांना कशी मिळाली हे ते सांगू शकले नाहीत. तर दुसरीकडे करण सजनानी यांनी त्यांची घड्याळ छापेमारीत आशिष रंजन यांनी घेतल्याचा आरोप केला आहे. या केसचे आयओ आशिष रंजनच होते.
दोनशे किलो गांजा नव्हताच
पूर्ण एनसीबीच्या विरोधात माझी तक्रार नाही. मात्र काही अधिकाऱ्यांच्या विरोधात माझी तक्रार आहे. मीडियात लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी समीर वानखेडे आणि त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्या.आमच्या प्रकरणात 200 किलो गांजा सापडला असं म्हणत आम्हाला अटक केली. मात्र कोर्टासमोर सादर केलेल्या लॅब रिपोर्टमध्ये तो गांजा नसल्याचे सिद्ध झालं. तरीही आम्हाला जास्तीचे चार महिने तुरुंगात काढावे लागले, असं सजनानी यांनी सांगितलं.
सुशांत प्रकरणात आरोपी बनवण्याचा प्रयत्न
समीर वानखेडे यांनी मला माझ्या मूळ केसच्या व्यतिरिक्त सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये आरोपी बनायला सांगितलं होतं. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्यांना एक षडयंत्र होतं असं दाखवायचं होतं. त्यामुळे त्यांनी मलाही आरोपी बनायला सांगितलं होतं, असा आरोप सजनानीने केलाय.चूप बसण्यास सांगितलं
शिवाय छापेमारीदरम्यान घरात असणारी माझ लाखो रुपयांच घड्याळ गायब झाल होतं. मी एनसीबी अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता गप्प बसण्याची वॉर्निंग अधिकाऱ्यांनी दिली होती, असाही आरोप त्याने केलाय. सजनानी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या ड्रग्स प्रकरणातील सहआरोपी आहेत.