मुंबई APMCत राजकीय फलक कायम?, NMMC, APMC व निवडणूक निर्णय अधिकार्यांचे दुर्लक्ष
 
आचारसंहिता लागू होऊन सुद्धा राजकीय पक्षांच्या फोटो   फलकांवर चमकतात
मुंबई APMC फळ ,भाजीपाला ,धान्य मार्केटमध्ये राजकीय पक्ष्याचे फलक  
विविध राजकीय पक्षाचे अनधिकृत कंटेनर कार्यालयावर नेत्यांचे छबी असलेले नामफलक
संचालक व उप सचिवांच्या संगनमताने कंटेनर कार्यलयात   केला जातो प्रचार
नवी मुंबई : अठराव्या लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होताच नवी मुंबई शहरात   सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांसह नेत्यांच्या संपर्क कार्यालयांवरील पक्षाचे ध्वज काढण्यात आले. तर नामफलकांवर कापड झाकण्याची लगबग सुरू झाल्याचे पाहायला मिळाली. तर दुसरीकडे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये राजकीय फलक लावून जोरात प्रचार सूर करण्यात येत आहे . मार्केटमध्ये विविध राजकीय पक्ष्याचे कंटेनर कार्यालयात   फलक दिसून येत आहे.याकडे NMMC, APMC व   निवडणूक निर्णय अधिकार्यांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे . 
भाजप, काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उध्दव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच   मनसे आदी विविध पक्ष संघटनांच्या कार्यालयांवर प्रथम दर्शनी पक्षाचे नेत्यांच्या छबी असलेले नामफलकांवर कापड झाकण्यात आले. तर झेंडे काढून घेण्यात आले.मात्र मुंबई एपीएमसी भाजीपाला,फळ व धान्य मार्केट्मधे विविध राजकीय पक्षाचे अनधिकृत कंटेनर कार्यालयावर नेत्यांचे छबी असलेले नामफलकांवर अद्याप कापड झाकण्यात आले नाही ,त्यामुळे या राजकीय पक्ष कंटेनरमधून प्रचार करायला सुरुवात केली आहे . याकडे महापलिक ,एपीएमसी व निवडणूक निर्णय अधिकारी डोळेझाक करत असल्याची चर्चा बाजार आवारात सूर आहे .