मुंबई Apmc मध्ये हापूसचे दर तीनशे रुपयांनी वधारले
यंदा बहरातील आंबा संपुष्टात आल्यामुळे मुंबई apmc बाजारातील आवक कमी झाली आहे. परिणामी, हापूस आंब्याच्या पाच डझनांच्या पेटीचा दर २०० ते ३०० रुपयांनी वाढला आहे. दर्जेदार फळासाठीच दर वाढला असला तरीही यंदा मुळातच उत्पादन कमी असल्याने दरवाढीचा फायदा थोड्याच बागायतदारांना मिळणार आहे.कोकणातील आंब्याचे वाशी बाजारातील आगमन तुलनेत यंदा लवकर झाले. फेब्रुवारीच्या अखेरीस बऱ्यापैकी पेट्या वाशीमध्ये विक्रीला पाठवल्या गेल्या.
गुढीपाडव्यानंतर आंब्याच्या पेट्यांची संख्या पन्नास हजारांवर पोहोचली होती परंतु गेल्या आठ दिवसांमध्ये आवक घटली असून सुमारे दहा ते बारा हजार पेट्या कमी दाखल होत आहेत.
एपीएमसी बाजारात फेब्रुवारी-मार्चमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत तीन ते चार पटीने आवक वाढली होती. मात्र आता आवक कमी होत असून मागील वर्षी एप्रिलमध्ये साधारणता एक लाख पेट्या दाखल झाल्या होत्या , मात्र आता ३५ हजार पेटी दाखल झालेली आहे. तर दुसरीकडे इतर राज्यातील आंब्याची आवक मात्र वाढली आहे.एपीएमसी बाजारात जानेवारी फेब्रुवारी महिना सुरू होताच अवीट गोडी करता प्रसिद्ध असलेला हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. यंदा अवकाळी पावसाने हंगामाला उशिराने सुरुवात झाली,परंतु उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र हवामान बदल आणि पुन्हा पडलेल्या अवकाळी पावसाने उत्पादन खराब होण्याच्या भीतीने हापुस आंबा शेतकऱ्यांनी वेळे आधीच आंब्याची तोडणी केली. त्यामुळे एपीएमसी बाजारात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दरवर्षीपेक्षा अधिक उत्पादन दाखल होत होते.बाजार आवरत इतर आंबे बदामी प्रतिकिलो ७०-९०रुपये, लालबाग ६०-७०रुपये तर कर्नाटक हापूस ८०-१५०रुपये किलोने उपलब्ध आहे