मुंबई APMC च्या अपात्र संचालकांना उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती
नवी मुंबई: मुंबई APMC चे   ६ अपात्र संचालक याना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे त्यामुळे संचालक मंडळाची संख्या १४ वर पोहचली आहे . आता कोरम पूर्ण झाल्याने मुंबई APMC   वर संचालक मंडळ पुन्हा एकदा नव्याने त्यांच्या कारभार सांभाळण्यासाठी   सज्ज होणार आहे.अपात्र संचालक याना मिळाले स्थगिती मधे 
बाळासाहेब सोळस्कर ,माधवराव जाधव , जयदत्त होळकर ,प्रभू पाटील ,वैजनाथ शिंदे, धनंजय वाडकर या सहा सदस्यांना अंतरिम स्थगिती दिली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधे आपआपल्या विभागातून आलेले ६ शेतकरी प्रतिनिधी याना त्याच्या कार्यकाळ संपल्याने १ वर्षांपासून   अपात्र घोषित करण्यात आले होती.
मुंबई APMC वर संचालक मंडळाचं कोरम पूर्ण न झाल्याने   सहा महिन्यापासून सभापती नसल्याने एकही बैठक झाली नव्हती १२ जून रोजी मुबई उच्च न्यायायलाने ६ अपात्र संचालक   यांना अंतरिम स्थगिती दिली आहे त्यामुळे बाजार समितीवर सध्या संचालक मंडळ लवकरात येणार आणि नवीन सभापती पदासाठी निवडणूक होणार अशी माहिती सूत्राने दिली आहे . सूत्रांच्या माहितीनुसार प्रभू पाटील हे सभापती पदाचे दावेदार असल्याचे समजते.