पैसा ,सत्ता ,कीर्ती पाहिचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन चला प्रल्हाद वामनराव पै यांनी दिला मार्केट संचालकाला कानमंत्र
-मुंबई APMC घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचा 28वा वर्धापन दिन सोहळा
-वर्धापन दिन व श्री छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा निमित्त विविध कार्यक्रम पार पडला .
-श्री प्रल्हाद वामनराव पै यांच्या उपस्थितीत संगीतमय कार्यक्रम
-स्वार्थ सोडा ,सर्वाना सोबत घेउन चला,तुमचे जीवन सुधारणार -श्री प्रल्हाद वामनराव पै यांच्या गारंटी
-भ्रष्टाचारच्या पैसे टिकत नाही ,संसार उध्वस्त होतो   -श्री प्रल्हाद वामनराव पै
नवी मुंबई : मुंबई APMC भाजीपाला घाऊक व्यापारी महासंघाचा 28वा वर्धापन दिन सोहळा तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भाजीपाला बाजार आवारात महासंघातर्फे भव्य दिव्य महोत्सवाचे आयोजन केले होते . यानिमित्त महासंघातर्फे बाजार आवारात श्री सत्यनारायण महापूजा ,जीवनविद्या मिशनचा समाज प्रबोधन सोहळा झाला. या प्रसंगी प्रख्यात प्रबोधक   प्रल्हाद वामनराव पै (Pralhad Wamanrao Pai) यांनी व्यपाऱ्यासाठी 'आरोग्य तनाचे व मनाचे ' या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. प्रल्हाद वामनराव पै यांनी सांगितलं कि स्वतःचा विचार करा, परंतु, स्वतःचा विचार करताना इतरांचा विचार करायलाही शिका. जी पिढी सर्वांचा विचार करते, ती फक्त त्याग करायला सांगत नाही. तर, तू सुखी हो, मग इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न कर, भ्रष्टाचारच्या पैसे टिकत नाही संसार उध्वस्त करतो ,सर्वाना सोबत घेऊन पुढे जा तन व मन दोन्ही चांगलं राहील मी गॅरंटी देतो अशी शिकवण   प्रल्हाद पै यांनी उपस्थित मार्केट संचालक सह व्यपाऱ्यांना कानमंत्र दिले . प्रल्हाद पै यांनी सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचे सोपान अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगितले..यावेळी मुंबई apmc भाजीपाला मार्केट   संचालक शंकर पिंगळे, IPS वैभव निंबाळकर, कल्पना नाईक, महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजणे, कार्यध्यक्ष सुनील मांढरे, सचिव चंद्रकांत जाधवसह जीवनविद्या मिशन व जीवनविद्या फाउंडेशनचे सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते .