उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूज अन् पपईचे दर वाढले
उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूज अन् पपईचे दर वाढले
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये रसाळ फळांच्या मागणीत वाढ
नवी मुंबई : उन्हाळा सुरू होताच मुंबई APMC फळ मार्केटमध्ये थंडगार ,रसाळ फळांना मागणी वाढली आहे . कलिंगड ,टरबुज आणि पपईची आवकही वाढली आहे . कलिंगडाच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी उंचावते, तसेच गारवा मिळतो. उन्हाच्या तडाख्यापासून काही वेळासाठी सुटका होते. लाल बुंद असणाऱ्या टरबुजाचे दर यंदा वाढले असून २० ते २५   रुपये किलो,कलिंगड २५ ते ३० रुपये किलो ,पपई १५ ते २० रुपये किलो   दराने मुंबई APMC घाऊक बाजारात विक्री होत आहे .
बाजारात कलिंगड महाराष्ट्रासह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून आवक होत आहे . सध्या बाजारात टरबूज ,पपई आणि   कलिंगडच्या १०० ते   १५० गाडय़ा आवक सुरू आहे. तर महिनाअखेपर्यंत दोनशे गाडय़ा आवक होईल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. बाजारात शुगरबेबी आणि नामधारी कलिंगडाची आवक सुरू असून शुगरबेबीला अधिक मागणी आहे.
- कलिंगड २५ ते ३० रुपये किलो
- टरबुज २० ते   २५ रुपये किलो
- पपई -१५ ते २० रुपये किलो