नवी मुंबई APMC मार्केटमध्ये बटाट्याच्या दरात वाढ तर कांदा व लसणाची दर स्थिर
 
मुंबई APMC होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज २२० गाड्याची आवक झाली असून 62 गाड्यांतुन 29 हजार 800 गोणी बटाट्याच्या आवक झाली आहे . होलसेल मार्केटमध्ये आज   15 ते 25 रु प्रतिकिलो दराने बटाटा विक्री करण्यात आली आहे .किरकोळ मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने बटाटयाच्या दर ३० ते ३५ रुपये किलोने विकला जात आहे . सध्या घाऊक बाजारात बटाटयाच्या आवक कमी जास्त येत आहे त्यामुळे आठवड्यापूर्वी १० ते १५ रुपये विकला जाणारा बटाटा आता भाव खात आहे .
कांदा बटाटा होलसेल मार्केटमध्ये मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश मधून बटाट्याची आवक होत असते. नेहमी बाजारात दररोज ७० ते ८० गाड्या बटाटा बाजारात येत असतो. बाजाराची दररोजची मागणी पूर्ण करण्यासाठी इतका बटाटा बाजारात यायला लागतो. मात्र गेल्या काही दिवसापासून बाजारात दररोज ३० ते ५० गाड्या बटाटा येत आहे. त्यामुले बटाट्याची मागणी पूर्ण करण्यासाठी हि आवक पुरेशी होत नाहीय. परिणामी बटाट्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. 
---
कांदा व लसणाची दर स्थिर
मुंबई APMC होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये 140 गाड्यातून 32 हजार 100 गोणी कांद्याचे आवक झाली आहे .मार्केटमध्ये कांद्याची दर 10 ते 20 रु. प्रतिकिलो विकला जात आहे . तसेच मार्केटमध्ये आठवड्यापूर्वी २५० ते २५० रुपये किलो विकला जाणाऱ्या लहसून आता १०० ते १६० रुपये वर आली आहे .आज होलसेल मार्केटमध्ये 15 गाड्यांतुन 4000 गोण्यांची लसणाची आवक झाली आहे.