मुंबई APMC घाऊक बाजारात कोथिंबीर, मेथी ,शेपू, कांदापात दरात वाढ
Mumbai Apmc Vegetable : भाजीपाला मार्केटमधील गेल्या आठवड्याच्या तुलनेत   भाज्यांपेक्षा   पालेभाज्यांची आवक किंचित वाढली.   कोथिंबिर, शेपू, कांदापात, मेथीच्या दरात वाढ झाली आहे. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती भाजीपाला   व्यापाऱ्यांनी दिली.
आज भाजीपाला घाऊक बाजारात कोथिंबीर ३०, कांदापात २०,मेथी २५,मुळा ३०, शेपू २० रुपये जुडी विकला जात आहे. सोमवारी   भाजीपाला घाऊक बाजारात   कोथिंबिरच्या १ लाख ४० हजार जुडी , मेथी ४३ हजार जुडीं,पालक १ लाख १४ हजार जुडी ,कांदापात ६६ हजार जुडी , शेपू २० हजार जुडीच्या   आवक झाली आहे