Independence Day 2023 | स्वतंत्र दिनानिमित्त 2021 ते 2023 पर्यंत मुंबई Apmc सभापती अशोक डक यांची भाषण.
Ashok Dak : देशात आज सर्वत्र ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत देखील आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मुंबई Apmcचे कार्यवाहू सभापती अशोक डक यांनी आज तिसऱ्यांदा मुंबई Apmc प्रशासकीय इमारतीच्या परिसरात   ध्वाजारोहण केलं व सर्व बाजार घटकांना संबोधित केलं. मात्र बऱ्याच संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यवाहू सभापती अशोक डक यांनी Apmc प्रशासनातर्फे अनेक नवीन योजनांची घोषणा केली.अनेक नवीन आश्वासने दिली.मात्र या भाषणात बरेच भाषण वर्ष   2021 -2022 मधे दिलेले होते , या वर्षी   डक यांनी आपला भाषणात सांगितले की ४ महिन्यात ३ कोटी रुपयांचे उत्पन्न वाढले , मागच्या दोन वर्ष कोविडमुळे उत्पन्न घटले होते आता हळूहळू उत्पनात वाढ होत आहे ,मात्र कोव्हिडमुळे उत्पन्न घटले नव्हते ,कोव्हिडमुले भाजीपाला,फळ,कडधान्य मार्केटमधे चौपट भावाने शेतमाल विक्री करण्यात आली आणि गर्दी वाढल्याने मार्केट ७ दिवस बंद ठेवण्यात आले होते , “ये पब्लिक सब जानती हे”, संचालक मंडळांनी कामे नकेल्याने उत्पन्न वाढीच्या वरोवर सर्व विकास कामे रखडले.आता वर्ष २०२३ -२४ च्या उत्पन्न वाढीचे कारण संचालक मंडळ मागील एक वर्षापासून बाहेर असल्याची चर्चा बाजार आवारात सुरू आहे .येणाऱ्या काही दिवसात होणाऱ्या सभापती पदाची निवडणुकीआधी अशोक डक यांच हे शेवटच संबोधन आहे का ?अशी चर्चा देखील बाजार आवारत सुरु आहे .मात्र राजकारणात काहीही होऊ शकत.
पाहूया मुंबई Apmc सभापती अशोक डक यांच्या वर्ष २०२१ ते २०२३ भाषणतील मुद्दे …
2021 -मधे डक यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की बाजार समितीचे उत्पन्न वाढवणार ,नियमनखाली गेलेला शेतमाल पुन्हा नियमनात आणणार ,बाजार समितीचे कामकाज शिस्तबद्ध करणार,संपूर्ण मार्केट संगणीकरण करणार,शेतकऱ्यांसाठी शेतमाल online विक्री करणार ,शेतकऱ्यांसाठी कोल्डस्टोरेज ,शेतकरी निवास ,गोदाम इत्यादीची सोय करणार.
2022-कांदा बटाटा मार्केट सह इतर मार्केटची पुनर्बाधणी करणार ,FSI वाढी बाबत शासनाशी   चर्चा करणार ,देना बँक घोटाळा मधे अडकलेले ६५ कोटी आता १०० कोटी व्याजासह परत आणणार ,मार्केटमधील अवैध व्यापार बंद करणार.
2023-मार्केटमधे ४ महिन्यात ३ कोटी रुपये उत्पन्न वाढले आहे, डक यांनी सांगितले की सर्व व्यापारी वर्गाचे मार्केटच्या पुनर्बांधणीसाठी एकमत झाल पाहिजे. मात्र याचे कारण एक वर्षापासून संचालक मंडळ बाहेर असल्याने ही उत्पन्न वाढ झाल्याचे बोलले जात आहे, डक यांच्या कॅबिन मधे ३ वर्षापासून मार्केट संचालक व काही व्यपाऱ्यासोबत जी चर्चा झाली त्याच काय ?मार्केटची विकास कामे का होत नाहीत? कोण व्यापाऱ्यामध्ये फूट पाडून न्यायालयात जाण्यासाठी सांगतात ? यावर कार्यवाहू सभापती व त्यांच्या सहकाऱ्यांनी   ३ वर्षात काय काय कामे केली अशी चर्चा बाजार आवारात सुरू आहे.शासनाचे   कुठलेही धोरण संचालक मंडळाच्या   विरोधात आले, की लगेच शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतो असे सांगण्यात येत. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे,आलेल्या शेतकरी प्रतिनिधीनी शेतकऱ्यांसाठी नाही तर आपल्या फायद्यासाठी मुंबई Apmcचे   काही व्यापारी प्रतिनिधी सोवत मिळून शेतकऱ्याची कशी लूट होईल तेच काम केले आहे, त्यामुळे आज आशिया खंडातील मोठया बाजारपेठेची दुर्दशा झाली आहे. वर्ष २०२४ चा   स्वतंत्रता दिनानिमित्त बाजार समितीत चांगल्या प्रशासकाची नियुक्ती करावी जेणेकरून बाजारसमिती शिस्तबद्ध चालेल अशी मागणी बाजारघटक करत आहेत.