मुंबई APMC धान्य मार्केट अनधिकृत बांधकाम ठिकाणी संचालकांची पाहणी दौरा
-पाहणी दौऱ्याच्या नंतर सभापती अशोक डक यांच्या फोन नॉट रिचेबल!
नवी मुंबई : विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आज मुंबई Apmc संचालक मंडळाची बैठक मुंबई Apmc प्रशासकीय इमारतीत पार पडली. सदर बैठकीत धान्य मार्केटमधील W विंगमधील अनधिकृत बांधकामचा मुद्दा गाजला. या नंतर संचालक मंडळाने W विंगमध्ये घटनास्थळी जाऊन पाहणी दौरा केला व तेथील बांधकाम बघून संचालक मंडळाला धक्का बसला. यावेळी सुधीर कोठारी, निलेश वीरा, शासन नियुक्त संचालक दिलावर बेग ,सतीश ताठेसह सचिव , सह सचिव, मार्केट अभियंता व कार्यकारी अभियंता उपस्थित होते. आम्ही सगळे निवडणुकीत व्यस्थ असताना याठिकाणी बांधकामाला परवानगी कोणी दिली ? व आम्हाला का कळवण्यात आले नाही, असं सवाल संचालकांकडून यावेळी उपस्थित करण्यात आला. मात्र आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, ही बांधकाम परवानगी मिळण्याआधी सर्व संचालक निवडणुकीत व्यस्थ असताना सभापतींच्या बंद केबिनमध्ये मार्केट संचालक, सभापती, संबंधित गाळा मालक व काही अभियंत्यांची बैठक झाली होती, त्यांतर सदर बांधकाम करण्यात आले. त्यामुळे आता सर्व संचालक मंडळाने याठिकाणी पाहणी दौरा केल्यानंतर आता यावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई APMC होलसेल धान्य मार्केट मधील W विंग मधे दुरुस्तीच्या नावाखाली एकूण ८२ गाळ्यावर एकत्रीकरण करण्याकरिता तोडफोड करत असल्याची बातमी Apmc News डिजिटल चॅनेलने दाखवली होती. त्याची दखल तुर्भे महापालिकेने घेऊन सदर ठिकाणी पाहणी दौरा केला. यावेळी या बांधकामकरिता Apmc प्रशासनाने व महापालिकेने परवानगी दिल्याची माहीती देण्यात आली होती, मात्र महापालिकेने ही परवानगी 16 वर्षांपूर्वी दिली होती.महापालिकेने पाहणी केली असता, पॅसेज,गाळ्याची भिंत ,कॉलम तोडफोड करून पॅसेजचा भाग लोखंडाचे स्ट्रक्चर टाकून बंद करण्यात आला ,त्यामुळे खाली असलेल्या गाळ्यावर लिकेजला सुरुवात झाली तसेच गाळ्यावर कधीपण स्लैब कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापाललिकेने Apmc सचिवांना स्ट्रक्चरल ऑडिट करून रिपोर्ट सादर करण्याची नोटीस बजावली आहे.