APMC मसाला मार्केटमधे सिडको विरोधात आयोजित कीर्ती राणाच्या जाहीर सभा फ्लॉप! रिकाम्या खुर्च्या

-द न्यू बॉम्बे कॉमन वेअरहाउस भूखंड वाचवण्यासाठी जाहीर सभा
-नवी मुंबई मर्चेंट चेंबरचे अध्यक्ष कीर्ती राणातर्फे आयोजित जाहीर सभेत व्यापाऱ्यांनी फिरवले पाठ!
नवी मुंबई : मुंबई APMC मसाला मार्केटच्या अति धोकादायक इमारती खाली १४ एप्रिल रोजी नवी मुंबई मर्चंट चेंबरचे अध्यक्ष किर्ती राणा यांच्या नेतृत्वाखालील सिडकोच्या विरोधात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या जाहीर सभेत व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. सभेत सर्व रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या, यामागचे कारण चेंबरच्या माध्यमातून आता पर्यंत मार्केटच्या व्यापाऱ्यांचा फायदा न होता काही पदाधिकाऱ्यांचा फायदा झाला, त्यामुळे व्यापाऱ्यांचा फायद्यासाठी बोलावण्यात आलेल्या जाहीर सभेत काही ठराविक व्यापारीच दिसून आले .चेंबरचे अध्यक्ष प्रत्येक बैठकीत सांगतात की माझा सोवत चला मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला भेटून सर्व समस्या सोडवू . प्रत्येक बैठकीत शाह व फडणवीस नाव समोर आणून व्यापाऱ्यांना चॉकलेट दाखवण्याची पद्धती सध्या सुरू आहे त्यामुळे अध्यक्ष बोलून राहतात नंतर सर्व बिसरून जातात .
द न्यू बॉम्बे मर्चंट्स कॉमन वेअरहाउस संस्थेच्या मार्फत व्यापाऱ्यांसाठी सिडको कडून साडे नऊ एकरचा भूखंड देण्यात आला होता, त्याकरिता ८६२ व्यापारी व दलाल यांनी पैसे भरले होते .या भूखंडावर २० वर्षापासून वेयरहायस बांधण्यात न आल्याने सदर भूखंड सिडकोने ताब्यात घेतला होता. त्यामुळे आपल्या व्यापाऱ्यांची जागा आपल्याला मिळावी याकरिता नवी मुंबई मर्चंट चेंबरचे अध्यक्ष कीर्ती राणा यांनी जाहीर सभा ठेवली होती त्याकरिता मार्केटमध्ये सर्वत्र बॅनरबाजी करण्यात आली होती. मार्केटमधे बॅनरबाजी ज्याप्रमाणे होत त्या प्रमाणे पैसे भरलेले सभासद दिसून आले नाही त्यामुळे नवी मुंबई मर्चंट चेंबरतर्फे ठेवण्यात आल्या सदर जाहीर सभा फ्लॉप झाल्याची चर्चा बाजार आवारात सुरू आहे .
मार्केटमध्येच जवळपास ७०० व्यापारी व दलाल मिळून जवळपास दोन हजार आहेत . ही सर्व नवी मुंबई मर्चंट चेंबर मधे मेंबर आहे .ज्यावेळी चेंबरचे अध्यक्ष कीर्ती राणा जाहीर सभा बोलावतात व सभेस कोणीच येत नाही यावर चर्चा होऊ लागली आहे .प्रत्येक सभासदांना सांगण्यात येत आहे की भरलेले पैसेची पावती चेंबर कडे जमा करा मात्र कोणी जमा करत नाही यांच्या कारण ही सर्व मेंबरचे अध्यक्षवर विश्वास नाही .त्यामुळे प्रत्येक विंग मधे बोलवून सुद्धा व्यापारी या जाहीर सभेत आली नाही .जाहीर सभेच्या खाली खुर्च्या बघूनच तुम्ही अंदाज लावू शकता.
बाजार समितीमधील FSI घोटाळा ,अनधिकृत बांधकाम ,अति धोकादायक इमारत ,पिण्याचे पाणी ,उघडपणे पडलेले विद्युत वायर वर आता पर्यंत कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता काम केला जात आहे अशी माहिती यावेळी काही व्यापाऱ्यांनी दिली आहे .भरलेले पैसेची पावती चेंबरमधे द्या नाही तर तुम्हाला यापुढे चेंबर मदत करणार नाही असे इशारा यावेळी आलेले व्यापाऱ्यांना देण्यात आला .असे प्रकारे दबाव तंत्र वापरून सर्व साधारण व्यापाऱ्यांना दिशाभूल करण्याची काम चेंबरचे पदाधिकारी करत असल्याची चर्चा बाजार आवरत सुरू आहे.जे विरोधात जातात त्यांना कायद्याचा दुरुपयोग करून त्रास देण्याचे काम केले जात असल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी दिली आहे .