Kisan Samrudhi Kendra: मुंबई APMC फळ मार्केटमधे किसान समृद्धी केंद्रांचं उद्घाटन शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी ?
 
नवी मुंबई: केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना किसान समृद्धी केंद्राचे उदघाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते वर्चुअल पद्धतीने   मुंबई APMC फळ मार्केटच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये   करण्यात आले . या उदघाटनामध्ये ऐरोलीचे आमदार गणेश नाईक ,संचालक मंडळ ,मार्केटचे ठराविक व्यापारी उपस्थित होते ,सर्वात महत्वाची बाब अशी कि, आशिया खंडातील मोठ्या बाजारपेठेमध्ये उदघाटन प्रसंगी शेतकरी नाही तर सर्व व्यापारी दिसून आले   . किसान समृद्धी केंद्राच्या उदघाटनासाठी आमदार   गणेश नाईकांना अंधारात ठेवलं आहे . काही संचालक मंडळांनी आमदार नाईक याना सांगितलं कि मार्केट मध्ये मोठा प्रमाणात शेतकरी उपस्थित राहणार आहेत , मात्र यावेळी शेतकरी नसून   फक्त व्यपाऱ्याचीच उपस्थिती दिसून आली. त्यामुळे फोटो मध्ये दिसणाऱ्या   संचालक मंडळाने जिथे शेतकरी आहेत त्या भागात किसान समृद्धी केंद्राचे उदघाटन करावे, अशी चर्चा बाजार आवारात होत आहे .  
‘आमची अनधिकृत बांधकामं ,अवैध शेतमालाचा व्यापार ,संचालक मंडळावर वर्षानूवर्षे लागलेली साडेसाती , आम्ही व्यापारी शेतकऱ्यासोबत आहोत ,आम्ही   उद्ध्वस्त झालो आहोत. आता दादा,   तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता, अशा शब्दात काही संचालक व ठराविक व्यापाऱ्यांनी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक याना साकडे घातले . आपल्या भावना समजल्या असून आपले प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू ,अशी ग्वाही नाईक यांनी दिली . या अगोदर   देखील सभापती अशोक डक यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव राजेश भुसारीसह काही अधिकारी कर्मचारी , धान्य मार्केटचे काही व्यापारी   व्हाईट हाऊस वर गेले होते त्यावेळी सभापती यांनी मार्केटचा एकही संचालक याना सोबत घेतले नव्हते, त्यामुळे चार भिंतीच्या आत काय निर्णय झाला यावर बाजारघटक संभ्रमात आहे ,आणि आताचे किसान समृद्धी केंद्राचे उदघाटन पण व्यापाऱ्यांनी आमदारांना अंधारात ठेवून चार भिंतीमध्ये करण्यात आले .मार्केटचा   खरा विकास करायच असेल तर संचालक मंडळांनी या चार भिंतीच्या चौकटीतून वाहेर पडाव, असं बाजार घटकांचं मत आहे.