मुंबई APMC सह राज्यातील ताज्या घडामोडी - TOP TEN NEWS 10/04/2023
- मुंबई Apmc भाजीपाला मार्केटमध्ये आवक वाढल्याने झाल्याने दरात घसरण. मटार ५५ रुपये ,कारली ३० रुपये ,फरसबी ३५ रुपयांनी विक्री
१) मुंबई Apmc भाजीपाला मार्केटमध्ये जवळपास ६५६   गाड्यांची आवक झाली असून मटार ५५ रुपये ,कारली ३० रुपये ,फरसबी ३५ रुपये, गवार ५५ रुपये दराने विक्री होत आहे .. आवक वाढल्याने झाल्याने दरात घसरण झालेली दिसून येत आहे ...
- मुंबई Apmc कांदा बटाटा मार्केटमध्ये कांदा   १० ते १५ रुपये किलो ,बटाटा १० ते १७ रुपये प्रतिकिलो, लसूण ५० ते १०० रुपये प्रतिकिलोने विक्री
२) मुंबई Apmc कांदा बटाटा मार्केटमध्ये जवळपास २३५ गाड्या कांद्याची आवक झाली असून प्रत्येकी कांदा   १० ते १५ रुपये किलो ,बटाटा १० ते १७ रुपये प्रतिकिलो, लसूण ५० ते १०० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे..
-   मुंबई Apmc फळ मार्केटमध्ये १००० ते ३५०० या दरात आंब्याची विक्री होत आहे.. तसेच कलिंगड ,खरबूज ,पपई फळांची जोरदार विक्री
३) मुंबई Apmc फळ मार्केटमध्ये ६५०   गाड्यांची आवक झाली असून घाऊक बाजारात हापूस, बदामी आंबा दाखल झाला आहे .. १००० ते ३५०० या दरात आंब्याची विक्री होत   आहे.. तसेच कलिंगड , खरबूज ,पपई या फळांची देखील जोरदार विक्री होत आहे ..
- मुंबई Apmc धान्य मार्केटमध्ये डाळींच्या दरांत घसरण झाल्याने   सर्वसामान्यांना दिलासा मिळाला   आहे
४) मुंबई Apmc धान्य मार्केटमध्ये जवळपास ३०० गाड्यांची आवक झाली असून डाळींच्या दरात घसरण झालेली दिसून येत आहे .. तूरडाळ ९५ ते १००, मूगडाळ ९५ ते १०५ ,चनाडाळ   ५५ ते ६० , उडीदडाळ ९५ ते १०५ , मसूरडाळ ६० ते ६५   दरात विक्री होत आहे ..दर घसरण झाल्याने   सर्वसामान्यांना दिलासा मिळाला   आहे.. 
 
- मुंबई Apmc मसाला मार्केटमध्ये   काजू ४१० ते ५८० रुपये, बदाम ७५०, हळद १४०, ११० ते १५० रुपये किलोने खजूर विक्री
५) मुंबई Apmc मसाला मार्केटमध्ये २३० गाड्यांची आवक झाली असून   काजू ४१० ते ५८० रुपये, बदाम ७५०, हळद १४०, ११० ते १५० रुपये किलोने खजूर विक्री होत आहे  
 
-खानदेशात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
६)   जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मका, हरभरा, गहू, केळी ,मिरचीचं प्रचंड नुकसान झालंय. आधीच्याच नुकसानीची अद्याप मदत मिळालेली नसताना आता हे दुसरं संकट शेतकऱ्यावर कोसळलं आहे.
 
- अवकाळी पावसामुळे सोलापुरात शेतीचं नुकसान दोन एकर द्राक्षबागा भुईसपाट
७) वादळी वाऱ्यामुळे सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दोन एकर द्राक्षबागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. साधारण 40 ते 50 टन द्राक्ष उध्वस्त झाल्याने जवळपास 15 ते 16 लाखांचं नुकसान झालं आहे.
 
_ अकोला दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची भरपाई मुख्यमंत्र्यांची घोषणा
८) अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात दुर्दैवी घटना घडली यात 7 जणांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी   झाले आहेत.. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे..
 
_ नुकसानग्रस्तांच्या पाहणीसाठी राज्याचे कृषी आयुक्त संजय चव्हाण नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर
९) अवकाळीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी आयुक्त संजय चव्हाण स्वतः नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहे. कृषी मंत्री अचानक दौऱ्यावर असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ झाली आहे. नाशिकच्या कसमादे परिसरात कृषी आयुक्त स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहे.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार
१०) नाशिक, जळगावसह संपूर्ण राज्यात अवकाळीचा प्रचंड तडाखा बसल्याने . मका, हरभरा, गहू, केळी, मिरचीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे सोलापुरात उजनी धरणाजवळील मानेगावातील एमएसईबीच्या पोलवर वीज कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. यासर्व प्रकरणाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घेणार आहेत.