कोलकात्याची लिची मुंबई APMC बाजारात हंगाम सुरू झाल्याने आवक वाढली
-मुंबई APMC होलसेल फळ   मार्केटमधे   दररोज 200   ते   350 क्विंटल   आवक
-मार्केटमधे लिचीचे दर 200 ते 350 रुपये तर किरकोळ बाजारात 300 ते 400 रुपये किलो दराने विक्री
नवी मुंबई : रंगाने लाल चुटूक, काटेरी आणि चवीला
गोड असणाऱ्या लिची या फळाचा हंगाम सुरू झाल्याने मुंबई APMC फळ बाजारात लिचीची फळे लक्ष वेधून घेत आहेत. ग्राहकांकडून लिची या फळाला मोठी मागणी असल्याने त्याचे भाव तेजीत आहेत. घाऊक बाजारात एक किलो लिचीचे दर 200 ते 350 रुपये असून, किरकोळ बाजारात 300 ते 350 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. हंगामाची सुरुवात असल्याने कोलकाता आणि बिहार परिसरातून दिवसात ५ ते ६ ट्रक लिची बाजारात दाखल होत आहे. सद्यस्थितीत मुंबई APMC होलसेल फळ   मार्केटमधे   दररोज 200   ते   350 क्विंटल   आवक होत आहे. यंदाच्या लिचीच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती   लिचीचे व्यापारी गुप्त   यांनी दिली आहे .