मुंबई APMC मार्केटमध्ये कोकण हापूसच्या नावाखाली कर्नाटक, ‘आंध्र’च्या आंब्याची विक्री

-भरघोस नफा, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट
-आंब्यावर थेट केमिकल फवारणी करून गळ्यावर साठा केला जातोय
-मार्केट संचालक व अन्न औषध प्रशासनच्या अभद्र युतीमुळे सदर भेसळ सुरू आहे
-हापूस आंब्याचा आवक मोठा प्रमाणात होऊन सुधा भेसळ थांबेना ,यांच्या कारण 60 टक्के व्यपारी आपल्या गाळे भाडेवर दिले आहे .भाडे भरण्यासाठी बंगाली टोळी हापूसच्या नावाने कर्नाटक आंबा विक्री करतात अशी माहिती काही व्यापर्याने दिले आहे .
नवी मुंबई : मुंबई APMC होलसेल फळ मार्किट आणि परिसरात कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या हापूसची सर्रास विक्री होत आहे. हा आंबा दिसायला कोकणातील हापूस सारखा असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे केवळ रंगाला आणि आंब्याच्या दिसण्याला भुलू नका. त्यामुळे ग्राहकांनी तुम्ही मार्केटमध्ये आंबे खरीदीसाठी येतात तर सजग राहावे, असे आवाहन कोकणातील हापूस विक्रेत्यांनी केले आहे.
उन्हाळा सुरू झाला, की आंब्याचा मोसम सुरू होतो. वर्षातून एकदाच हापूस आंबा चवीला मिळतो. आंबे खावे तर कोकणातलेच त्याकरिता अनेकदा आपण देवदगडच्या आंब्यांची पेटी खरेदी करतो. पण पेटी मधला आंबा हा नक्की देवगडचाच आहे का याची खात्री आपण कधी करत नाही या बाबत शंका देखील उपस्तित करत नाही. त्यामुळेच मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आंबा लवकर पिकवण्यासाठी केमिकलचा फवारणी करून ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. महत्वाचे बाब अशी आहे की ही सर्व मार्किट संचालक यांच्या आशिर्वादाने सुरू असल्याची बोलले जाट आहे .त्यामुळे अन्न औषध प्रशासन अधिकारी मार्केटमध्ये येऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष करतात .
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर तुम्हाला सर्वच गाळ्यावर हापूस आंब्याच्या पेट्यांची थप्पी लावलेली दिसून येईल. मात्र यामध्ये नक्की हापूस आंबे आहेत का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मुंबई एपीएमसी होलसेल फळ मार्केटमधे कसा प्रकारे भेषाल केला जातोय … …फळ मार्केट मध्ये जवळपास ६० टक्के व्यापऱ्यांनी आपले गाळे भाडेतत्वावर दिले आहेत, व्यापाऱ्यांनी एका गाळ्यात २ ते ४ माणसे बसवले असून महिन्याला २ ते ४ लाख रुपये भाडे वसुली करत आहेत. सध्या फळ मार्केटमध्ये आंबाच्या हंगामात ४ महिन्यासाठी बंगाली टोळी काबीज केलं आहे. सध्या देवगडचा हापूस आंबा 300 ते 700 रुपये डझन तर कर्नाटक हापूस आंबा 80 ते 100रुपये किलोंनी विकला जातोय. फळ मार्किट मधे सध्या 1 लाख पेक्षया जास्त आंबाच्या पेट्याची आवक होत आहे यामधे कोकणातील हापूस आंबाच्या जवळपास 80 हजार पेट्या येत आहे तर कर्नाटक व इत्तर राज्यातून जवळपास 30 हजार पेट्याची आवक होत आहे .
ही टोळी मार्केटमध्ये रात्रीच्या वेळी खेळी करतात … कॅरेट मधून कर्नाटकी कच्चे आंबे गाळ्यात उतरवल्यानंतर देवगडच्या लाकडी आणि कागदी पेट्यांमध्ये इथरेलची फवारणी करून देवगड हापूस आंबाचा पेटी तयार केली जाते आणि गाळ्यांमध्ये या पेटीचा साठा केला जातो, त्यानंतर दोन दिवसांमध्ये हा हिरवागार आंबा पिवळा धम्मक होतो व लगेच याची विक्री केली जाते. सध्या बाजार आवारत आंब्यांची आवक मोठा प्रमाणत होत आहे …कोकणातील हापूस आंब्याचा आवक जास्त होऊन सुद्धा जास्त नफा कमवण्यासाठी काही व्यापाऱ्याने कोकलातील हापूस आंब्यांच्या पेटित कर्नाटकी आंबा भरून थेट आंबावर केमिकल फवारणी करून ग्राहकांची जीवाशी खेळला जात आहे .
इथरेलद्वारे पिकवलेला आंबा हा वरुन पिवळा दिसतो. वरवर पाहता हा आंबा आकर्षक दिसतो. मात्र याची चव तुरट आंबट लागते. चवीसोबतच नागरिकांच्या आरोग्यासोबतही खेळ केला जातो. भरघोस नफा, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे .परंतु तयार आंब्यावर केली जाणारी केमिकलची फवारणी अत्यंत घातक आहे . त्यामुळे यावर मार्केट संचालक आणि अन्न औषध प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे .त्यामुळे तुम्ही तर आंबा खरेदी करताना चौकशी करूनच खरेदी करा!