कार्यवाहू सभापती अशोक डक यांच्या मार्केटच्या पाहणीदौरावर अनेक प्रश्नचिन्ह.
Mumbai Apmc Chairman News: सभापती असताना कामे शून्य मग कार्यवाहू सभापती असताना   कामांचा आढावा घेण्याचे सोंग का ?    
 
मुंबई Apmc सभापती अशोक डक व उप सभापती धनजय वाडकर यांच्या ३ वर्षाच्या कार्यकाळात पाचही मार्केटमधे मार्केटच्या अडीअडचणींत व विकासकाम सोडविण्यासाठी   मार्केट संचालक सोबत   जवळपास १० वेळा पाहणी दौरा करुन सुद्धा मार्केटच्या विकास कामा संदर्भात एकही निर्णय घेण्यात आले नव्हते ,सभापती अशोक   डक यांनी राजीनामा दिल्यापासून ६ महिना पासून मार्केटचे   काम काज सुरळीत सुरु असतना कार्यवाहू सभापती अशोक डक यांनी १९ जून रोजी अचानक पणे आढावा बैठक घेतले या बैठकीत बाजार समितीचे सचिव राजेश भुसारी ,उप सचिव प्रकाश अष्टेकर ,आणि पाचही मार्केटचे उप सचिव ,अभियांत्रिक विभाग ,सुरक्ष्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते ,महत्त्वाचे बाब अशी आहे की मार्केटच्या विकासकामे आणि अडीअडचणीत बाबत बैठक असतना मार्केट संचालक   अनुपस्थित होते तर सभापती असताना ३ वर्षात काहीच काम केले नाही तर आता कार्यवाहू सभापती अशी आढावा बैठक घेवून काय करणार पाहणी दौऱ्यात मार्केटमधील व्यापारी आणि कामगारांनी ड्रेनेज लाईनच व अन्य समस्या ज्या मुळे कामगार त्रस्त आहेत असे   प्रश्न उपस्थित केले. कितीतरी वर्ष समस्यांबाबत अनेक   प्रश्न अशोक डाक यांच्या कानावर जातात पण त्यावर काम अद्यापही झाले नाहीत मग आढावा बैठक किंवा या पाहणी दौऱ्याचा काय उपयोग ?? 
मुद्दे   तेच ,प्रश्न तेच ,बैठक पे बैठक अशी चर्चा बाजार आवारात सुरु आहे. सभापती साहेब ३ वर्षापासून मार्केट संचालक सोबत जे दौरे केले होते त्यांचं काय झालं आणि आता या पुढे पावसाळ्यात हि कामे मार्गी लागणार का यावर बाजार घटकाचे लक्ष्य लागले आहे.