मुंबई APMC फळ मार्केटच्या उपसचिवांचा भोंगळ कारभार कामगाराची ५० टक्के मजुरी बोर्डामध्ये जमा नाही !
मुंबई APMC फळ मार्केटच्या उपसचिवांचा भोंगळ कारभार कामगाराची ५० टक्के मजुरी बोर्डामध्ये जमा नाही !
भाजीपाला आणि फळ मार्केटच्या कामगारांची मजुरी जाते कुठे ?
नवी मुंबई: मुंबई APMC फळ मार्केट मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ,. फळ मार्केटमध्ये काम करणाऱ्या मापाडी कामगारांची   ५० टक्के देखील मजुरी  
बोर्डमध्ये जमा   होत नाही त्यामुळे मापाडी कामगारांचा   पगार रखडला जात आहे   ,ज्या व्यापाऱ्यांनी वर्षभरात व्यापार   केले   त्यांची माहिती आम्ही लवकरात लवकर जाहीर करणार आहोत अशी   प्रतिक्रिया मापाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. . मार्केटमध्ये जो   व्यापार होतो त्यामधून बाजार समितीचा   सेस,कामगारांचे   पैसे आणि मार्केटच्या विकासकामांवर   नियंत्रण करण्यासाठी उप सचिव नेमला जातो .. मात्र मार्केटचे उप सचिव काही व्यपाऱ्यांच्या संगनमताने कामगाराची मजुरी सुद्धा आपआपसात वाटप करून घेतात अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली आहे..   त्यामुळे व्यापाऱ्यांनो कामगाराची मजुरी बोर्डामध्ये जमा करा ,नाहीतर   तुम्हाला अडचणीत सामोरे जावे लागण्याची परिस्थिती निर्माण होईल..