मुंबई APMC प्रशासनाचे भोंगळ कारभार ; फळ मार्केट मधील अग्निशमन यंत्रणेच्या राखीव जागेवर निर्यातदार आणि बँकांनी केला कब्जा
 
नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंजूर आराखडा मधील अग्निशमन यंत्रणेच्या राखीव जागेवर निर्यातदार आणि बँकांनी   कब्जा केल्याचे उघड झाले आहे. 
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने सिडकोकडून बाजारपेठा उभारण्यासाठी भूखंड घेतल्यानंतर या भूखंडावरती एपीएमसीच्या आर्किटेक्चरकडून विकास आराखडा करून घेतला. त्यानंतर हा आराखड्याला सिडकोकडून १९९७ मध्ये मंजुरी घेऊन बांधकाम केले. यामध्ये फळ मार्केटमध्ये २००० चौरस फूटची सुविधा इमारत बांधण्यात आली. यात बँक, दवाखाना,पोस्ट ऑफिस,पोलीस स्टेशन, अग्निशमन केंद्र या सेवासाठी ही इमारत राखीव होती मात्र २०१२ साली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाच्या डोळ्यावरती ही इमारत आली आणि त्यांनी प्रशासनाचे काही अधिकाऱ्या सोवत मिळून ही जागा   निर्यातदारांना तसेच बँकांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 
दरम्यान बाजार समितीच्या स्थापनेपासून फळ मार्केट, मसाला मार्केटसह अन्य बाजारपेठांमध्ये विविध कारणांमुळे आगी लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. नुकतीच काही महिन्यांपूर्वी फळ मार्केट मध्ये   आग लागून ३६ गाळे जळून खाक झाले होते. विशेष म्हणजे वरील सुविधा इमारतीच्या तळमजल्याला या अग्निशमन गाड्या सज्ज असत्या तर 
वेळीच अग्निशमन दलाची गाडी पोहोचली असती आणि   एवढ्या मोठ्या प्रमाणात ही आग लागली नसती व आगही वेळेत आटोक्यात येऊन व्यापाऱ्यांचे नुकसान झाले नसते. त्याहून अधिक गंभीर बाब म्हणजे ही आग जर दिवसा लागले असतील तर या बाजारपेठेमध्ये येणारे हजारो ग्राहक व्यापारी प्रतिनिधी यांच्या जीव गेले असते. त्यांनतर एपीएमसी प्रशासन जागे झाले असते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. फळ मार्केट संचालक सांगतात अग्निशमन दलासाठी आम्ही महापालिकेकडे जागेची मागणी करूनही ते जागा देत नसल्याचे वारंवार सांगत आहेत. तर एकीकडे स्वतःच राखून ठेवलेली अग्निशमन दलासाठीची जागा अन्य कारणांसाठी देऊन बसले आहेत. त्यामुळे संचालक मंडळाच्या या दुतोंडी कारभारावरही बाजार समिती घटकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.अग्निशमन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ही जागा   Apmc प्रशासन ताब्यात घ्यावी आणि संबंधित संचालक व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी बाजार घटकाने पणन मंत्री अब्दुल सत्तार कडे केली आहे ,आता यावर पणन मंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्व बाजार घटकाचे लक्ष लागली आहे .