मुंबई APMC मध्ये अण्णासाहेब पाटील जयंतीची जोरदार तयारी;CM फडणवीस उपस्थित राहणार ,प्रशासक मैदानात, सचिव ACत आरामात!
.png)
-मथाडी नेता नरेंद्र पाटील यांची भव्य तयारी
नवी मुंबई : मुंबई APMC होलसेल कांदा-बटाटा मार्केटच्या लिलावगृहात येत्या २५ सप्टेंबर रोजी स्व. अण्णासाहेब पाटील यांची ९२ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भव्य पद्धतीने साजरी केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्री व स्थानिक आमदारांसह अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.
या ऐतिहासिक कार्यक्रमाला भव्यतेची उंची देण्यासाठी मथाडी नेता नरेंद्र पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मार्केटमध्ये राज्यातून येणारे कामगाराना कुठल्याही प्रकारची त्रास होऊ नये म्हणून प्रशासक विकास रसाळ यांनी पाहणी दौरा करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत आहे तर दुसरीकडे सचिव खंडागले कार्यालयात बसून गप्पा मारत आहे अशी चर्चा बाजार आवारत सुरू आहे .
APMC संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक म्हणून विकास रसाल यांची नियुक्ती झाली असून, त्यांच्या नियुक्तीनंतर बाजारपेठेच्या कार्यपद्धतीत बदल होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यामध्ये   दिसून येत आहे. परंतु बाजार घटकांचे म्हणणे आहे की प्रशासक आल्यानंतर सचिव डॉ. पी. एल. खंडगाळे यांचा चेहरा सतत मुरगळलेला दिसतो.
याचे ताजे उदाहरण सोमवारी दिसले. प्रशासक रसाल यांनी काही अधिकाऱ्यांसह चिखलातून चालत कार्यक्रम स्थळाची पाहणी करत होते. तेव्हा सचिव खंडागले मात्र आपल्या कार्यालयात बसून ACची हवा घेत असल्याचे चर्चेत होते. रसाल यांनी स्वच्छता व सुरक्षा अधिकाऱ्यांना रस्ते, पाणी आणि स्वच्छता यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. मात्र सचिव खंडगाळे पूर्णपणे अनुपस्थित राहिले.
इतक्या मोठ्या कार्यक्रमाच्या तयारीत सचिवाचा सहभाग नसणे हे गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. मथाडी कामगारांनी स्पष्ट प्रश्न उपस्थित केला आहे की 
“अण्णासाहेब पाटील यांची जयंती साजरी करण्यासाठी माथाडी नेत्या पासून शासन-प्रशासन पूर्ण ताकदीने तयारी करत आहे, पण बाजार समितीचे सचिव का दूर आहेत? या कार्यक्रमात सर्वांनी समान सहभाग घ्यायला हवा.”