मुंबई APMC संचालक मंडळाची सभा 3 ऑगस्ट रोजी होणार की नाही? संचालक मंडळ संभ्रमात, पुढे काय होणार?
शरद पवार गट व काँग्रेस होणार हद्दपार
Mumbai Apmc Director Crisis: अशिया खंडातील सर्वांत मोठ्या आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या मुंबई APMCवर ताबा मिळविण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नाला न्यायालयाने सुरुंग लावला आहे. तब्बल एक वर्षापासून   संचालकांना अपात्र ,कोरम पूर्ण न झाल्याने सभापती व उप सभापती निवडणूक रद्द ,अशी खेळी सुरु होती .मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने सचिवांना   ४५ दिवसाच्या आत सभापती आणि उप सभापती यांची मिंटींग लावण्याचे आदेश दिल्याने शिंदे सरकारचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुंबई Apmc सचिव राजेश भुसारी यांनी गेल्या ३० जून रोजी संचालक मंडळाची सभा बोलावण्याचे आदेश काढले   होते .   या आदेशाला शासनाने रद्द केल होत . या आदेशाविरोधात काही संचालकानी न्यायालयात धाव घेतली होती , त्यावर न्यायालयाने सदर आदेशाला स्थगिती देत सचिवांना   ४५ दिवसाच्या आत सभा लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सचिवांनी ३ ऑगस्टला सभा लावण्यासाठी आदेश काढले आहेत. तसेच सचिव राजेश भुसारी यांनी सभापती व उप सभापती निवडणूक लावण्यासाठी जिल्हा निवंधकला पत्र पाठवल्याची माहिती देखील मिळाली आहे, मात्र जिल्हा निबनधकच्या कार्यालयातून अजून पर्यंत काही आदेश आले नाहीत.   त्यामुळे ही सभा होणार की रद्द होणार   यावर संचालक मंडळ संभ्रमात आहेत   .
सभापती पदावर अजित पवार गटाचे अशोक डक व सुधीर कोठारी मधे रसीखेच सुरू झाली आहे मात्र सूत्रानी सांगितल्याप्रमाणे अशोक डक याना परत सभापती पद मिळू शकत , कारण अजित पवार गटामध्ये सामील झालेले बीडचे आमदार प्रकाश सोळंकी व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या डक जवळचे आहेत , दुसरीकडे   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रभू पाटील   उप सभापती पदाचे दावेदार असल्याचे सांगितल जात आहे .
सभापती अशोक डक यांच्या सभापती पदाच्या ३ वर्षाच्या कारभाराबदल स्वतः संचालक मंडळ व बाजार घटक सुद्धा नाराज आहेत . डक यांच्या कार्यकाळात बाजार समितीचे नाव खराब झाले आहे. दुसरीकडे सुधीर कोठारी हिंगणघाट बाजार समिती मधे नेतृत्व करत असतना त्यांची कामपद्धती अत्यंत चांगली असल्याचे बोलले जात आहे.   त्यामुळे कोठारी यांना सभापती पद मिळाल्यास बाजार शिस्तबद्ध चालू शकतो असे बाजार घटकांचं मत आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसमधे बंड झाल्याने   मागील तीन दशकापासून   शरद पवारांकडे असलेली   बाजार समिती त्यांच्या हातातून जाणार आहे . त्यांच्या सोवत काँग्रेसच्या संचालकांना पण खाली हात बसाव   लागणार आहे .भाजप -शिंदे गट आणि अजितपवर गटाकडे सभापती आणि अप सभापती पद राहण्याची शक्यता वर्तविले जात आहे तर काँग्रेस कडे ४ संचालक असून सुद्धा उप सभापती पदावरुन हदपार होण्याची माहिती सूत्राने दिली आहे . मात्र राजकारणात काहीहि होऊ शकत.   त्यामुळे बाजारघटक सांगतात की आम्हाला संचालक मंडळ नको ! चांगलं प्रशासक नियुक्ती करा ज्यामुळे बाजार समितीचे कामकाज शिस्तबद्ध चालू   शकत .
सध्याचे संख्याबळामधील एकूण १८ संचालकांमधील राजेंद्र पाटील ,अशोक बालुंज,अद्वित हिरे अपात्र झाल्याने वाहेर आहे .उरलेले 15 संचालकांमध्ये अजित पवार गटाकडे अशोक डक ,सुधीर कोठारी ,जयदत होळकर ,शंकर पिंगळे ,संजय पानसरे हे 5 संचालक आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे प्रभू पाटील ,महादेव जाधव आहेत. शरद पवार गटाकडे शशिकांत शिंदे ,बाळासाहेब सोळसकर ,अशोक बलुंज आहेत मात्र बालुंज सध्या अपात्र असल्याने जिथे सत्ता असेल तिकडे ते   जाण्याची शक्यता आहे . काँग्रेसकडे हुकूमचंद अमधारे,प्रविण देशमुख ,धनंजय वाडकर ,बैज्यनाथ शिंदे आहेत. 
भाजप कडून   धान्य मार्केटचे संचालक निलेश वीरा आणि मसाला मार्केट संचालक विजय भुत्ता आहेत त्यामुळे भाजप -शिंदे गट आणि अजितपवर गटाकडे सभापती आणि अप सभापती पद राहण्याची शक्यता वर्तविले जात आहे तर काँग्रेस कडे ४ संचालक असून सुद्धा उप सभापती पदावरुन हदपार होण्याची माहिती सूत्राने दिली आहे . मात्र राजकारणात काहीहि होऊ शकत.   त्यामुळे बाजारघटक सांगतात आम्हाला संचालक मंडळ नको ! चांगलं प्रशासक नियुक्ती करा ज्यामुळे बाजार समितीचे कामकाज शिस्तबद्ध चालू   शकत .