मुंबई APMC संचालक मंडळाची सभा : काय मार्केट , काय सभा ,काय गेस्ट हाऊस ,बाकी सगळं OK आहे !
-मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालकांचे स्थानिक बाजार समित्यांतील संचालकपदाचा कालावधी संपल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.
Apmc Director Meeting : मुंबई APMC संचालकांचे स्थानिक बाजार समित्यांतील संचालकपदाचा कालावधी संपल्याने त्यांना अपात्र , कोरम पूर्ण न झाल्याने सभापती   अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी दिलेल्या राजीनामा ,शेतकरी आणि व्यापारी प्रतिनिधींमध्ये भांडण , मागील आठ महिन्यापासून शासन दरवारी आणि न्यायालयाची लढाई सुरु असताना आज आखिर सभेच्या मुहूर्त सापडला ते पण मुंबई उच्च न्यायालयाचा   आदेशानुसार. न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये स्पष्टपणे सांगितलं कि सभा घेण्याची अगोदर सभापती व उप सभापतीच्या निवड करा ,मात्र आजची सभेमध्ये सभापतींच्या निवड संचालकमंडळांनी   निवडणूक अधिकाऱ्याची परवानगी न घेता घेतली त्यामुळे सदर सभा अवैध असल्याची बोलले जात आहे .
गेल्या आठ   महिन्यांपासून रखडलेली मुंबई APMC   संचालक मंडळाची बैठक अखेर आज यांनी ३ आगस्ट रोजी घेण्यात आली . कार्यवाहू सभापती अशोक डक याना एक दिवसासाठी सभापती निवडण्यात आली नंतर सभे घेण्यात आली.सदर सभा न्यायालयाचे आदेशानुसार घेण्यात आल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधी सुधीर कोठारी यांनी दिली ,मात्र जे आदेश दिली होती त्यामध्ये सभापती व उप सभापती निवड करा नंतर सभा घ्या, मात्र आजची सभेमध्ये   संचालक मंडळाने निवडणूक अधिकाऱ्याची परवानगी न घेता तसेच निवडणूक अधिकारी उपस्थित नसताना सभापती व उप सभापतींच्या निवड करून कार्यबाहु सभापती अशोक डक यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली, सदर सभा निवडणूक अधिकारी नसताना घेण्यात आल्याने हि सभा अवैध असल्याची चर्चा सुरु आहे, यावर पणन मंत्री व पणन संचालक काय निर्णय घेणार याकडे सर्व बाजार घटकाचे लक्ष्य लागली आहे.
सभापती अशोक डक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये बाजारसमितीच्या विकासकामेसाठी   १६ विषयसूची ठेवण्यात आली होती, त्यापैकी काही विषय मंजूर केल्याची समजते आणि काही मंजूर झाली नाही, त्यामुळे हि सभा कोणाच्या फायदासाठी घेण्यात आली यावर चर्चा सुरु आहे .
आठ महिन्यानंतर होणाऱ्या   सभेसाठी   मागील ३ दिवसापासून वाहेरून आलेले शेतकरी प्रतिनिधी बाजार समितीच्या गेस्ट हाऊसमध्ये तळ ठोकून बसले होते , काही मार्केट संचालकांना   आपआपल्या मर्जीतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याचे   मार्केट मध्ये हवे यासाठी गेस्ट हाऊस मध्ये वन टू वन मिटिंग करण्यात आल्याची माहिती उपस्थित एका संचालकांनी नाव न सांगण्याच्या   अटीवर माहिती दिली आहे . गेल्या आठ महिने नंतर सभा ,३ तास झालेल्या सभेमध्ये मुद्दे तेच मात्र निर्णय काही नाही , त्यामुळे   व्यापारी ,कामगार व कर्मचाऱ्यामध्ये नाराजी सुरु आहे, सर्वात महत्वाची बाब अशी आहे कि , सभा संपल्यानंतर   सर्व संचालक मंडळ धावपळ करून गेस्ट हाऊस मध्ये गेले ,मात्र यामध्ये आमदार शशिकांत शिंदे नव्हते , गेस्ट हाऊस मध्ये शेतकरी प्रतिनिधी सोबत मार्केट   संचालक एकत्र गेल्याने   बाजार आवारात जोरदार   चर्चा सुरु आहे. अर्धातास नंतर   गेस्ट हाऊस मधून मार्केट संचालक व शेतकरी प्रतिनिधी एकत्र वाहेर आल्यावर चर्चेला उधान आली आहे .
सभा संपल्यानंतर शेतकरी व व्यापारी प्रतिनिधी अचानक गेस्ट हाऊसमध्ये धावपळ करून जाणे..   अर्धातास नंतर एकत्र वाहेर .. मार्केट संचालक आपल्या मार्केटमध्ये तर शेतकरी प्रतिनिधी एअरपोर्टकडे .. बाजार समितीच्या गेस्ट हाऊस मध्ये काय काय घडलं यावर लवकरात लवकर आम्ही तुम्हाला देणार आहोत ..