मुंबई APMC संचालक मंडल व प्रशासनातर्फे पक्ष कार्यालयसाठी राजकीय कार्यकर्त्याना रेड कार्पेट!
 
पक्ष्य कार्यलयासाठी जागा हवीय का ? मुंबई APMC मध्ये या .
-मुंबई APMC संचालक मंडल व प्रशासनातर्फे पक्ष कार्यालयसाठी   राजकीय कार्यकर्त्याना रेड कार्पेट
-काही दिवसात बाजार आवारात रंगणार राजकीय आखाडा  
-मुंबई APMC भाजीपाला व फळ मार्केटच्या संचालकाला संपर्क करा आणि पक्ष कार्यलयासाठी जागा मिळवा .
-बाजार आवारात फुटपाथवर विविध संघटनाव पक्ष कार्यालयच्या सुळसुळाट
-नाममात्र पैसे भरून पक्षाचे कार्यलय उघडा
-बाजार आवारात   स्टॉल ,विस्तारित स्टॉल ,संघटनांचे कार्यालय ,पक्ष कार्यालय मुळे बाजाराला बकाल स्वरूप
-पणन संचालकाच्या आदेशाला मार्केट उप सचिव दाखवतात केराची टोपली
-बाजार आवारात अशा प्रकारे राजकीय कार्यलय उघडण्याचा बाजार घटकाला काय फायदा आहे ? असा प्रश्न बाजार घटक विचारात आहे  
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ व प्रशासनातर्फे बाजार आवारात   विविध राजकीय पक्षाच्या कार्यलयासाठी एक प्रकारची 'अभय' योजना'   रावण्यात येत आहे .या योजनांच्या लाभ या पूर्वी बऱ्याच पक्ष्याने घेतलेली आहे आता परत योजना सुरु करण्यात आली आहे . त्यामुळे   विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्तांनी जागा मिळवण्यासाठी धावपळ सुरु केली आहे , या योजनेमध्ये नाममात्र पैसे भरा आणि भाजीपाला व फळ मार्केटमध्ये पक्ष कार्यालय उघडा असे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे ही मार्केट शेतकरी ,व्यापारी साठी आहे   या राजकीय पक्ष्यांसाठी असा   प्रश्न उपस्थित होत आहे .
एकीकडे शिंदे फडणवीस सरकार कडून बाजार समितीमधून राजकीय नेत्यांचे अड्डा संपवण्यासाठी कृषी व पणन सुधारणा ६४ कायदा अंमलबजावणी साठी हालचाली सुरु केलं आहे तर दुसरीकडे बाजार समिती मध्ये मार्केट संचालक व एपीएमसी प्रशासनाने बाजार आवारात कंटेनर मध्ये पक्ष कार्यलयासाठी जागे द्यायाला सुरुवात केली आहे .एकीकडे व्यापाऱ्यांना व्यापार करायला, येणाऱ्या शेतमालाक्या गाड्या उभ्या करायला   आणि सोयीसुविधा पुरायला जागा उपलब्ध नसताना राजकीय पक्ष्याच्या कार्यालयासाठी मात्र बाजार समिती जागे उपलभ करून देत आहे .   या धोरणामध्ये नाममात्र पैसे भरा आणि पक्ष कार्यलया उघडा   . या पक्ष कार्यलयातून शेतकरी ,कामगार व ग्राहकांना कुठल्याही फायदा नसून मार्केट संचालक व उप सचिवांना होत असल्याची चर्चा बाजार आवारात होत आहे . यामुळे बाजार समितीमध्ये   राजकीय कुरघोडी वाढायला लागल्या आहेत .
मुंबई कृषी उत्पन बाजार समितीमधील शेतकरी ,प्रामाणिक व्यापारी व माथाडी कामगाराना हद्दपार करून   पॅसेज ,धक्के ,फुटपाथ व रस्त्यावर शेतमालाची किरकोळ व्यवसाय सह राजकीय पक्ष्यांची कंटेनर कार्यालय व संगठनचे कार्यालय सुरु करून पूर्ण मार्केटला   बकाल स्वरूप आले   आहे   . सर्वात जास्त फळ व भाजीपाला मार्केटमधे   विविध राजकीय पक्ष व संगठनाचे कार्यलयाचा   सुळसुळाट झाली आहे. पणन संचालनालयकडून राज्याचे सर्व बाजारसमित्यांना एक परिपत्रक काढण्यात आला होता ,या पत्रकात म्हंटले होते कि बाजार आवारात कुठल्याही पक्ष्यांचे कार्यालय ,संगठन कार्यालय फुटपाथवर होऊ नये अशी आदेश असताना   देखील पणन संचालकाचा परवानगी बिना राजकीय पक्ष्याची कंटेनर कार्यालय बाजार आवारात वाढू लागली आहे .त्यामुळे मार्केट संचालक व उप सचिव यांनी मुख्यमंत्री व पणन संचालकाच्या आदेशाला   केराची टोपली दाखवली आहे . विविध राजकीय पक्ष्याच्या कार्यलय बाजार आवारात टाकण्याची   हेतू काय ? या कार्यलयातून कोणाच्या फायदा होत आहे ? बाजार आवारात कंटेनरमध्ये पक्ष्याच्या कार्यलय उघडून   आपल्या फायदा करून घेणाऱ्या त्या पदाधिकाऱ्यांचे कारनामे नेत्यांना माहिती आहे का ? या कार्यलयातून RTI च्या गैरवापर करून व्यापारी ,अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देण्याची उद्योग काही पक्ष्याचे पदाधिकारी करत असल्याची चर्चा बाजार आवारात होत आहे.
सूत्राने सांगितल्या प्रमाणे येणाऱ्या काळात बीजेपी ,काँग्रेस ,समाजवादी पार्टी ,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)   ,आम आदमी पार्टी ,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ,शेतकरी कामगार पक्ष ,स्वाभिमानी शेतकरी संगठन ,प्रहार संगठन ,वंचित बहुजन आघाडी सध्या बाजार आवारत आपल्या पक्ष व संगठन कार्यालय   सुरू करण्यासाठी हालचाली   सुरू केली आहे .त्यामुळे येणाऱ्या काळात बाजार समितीत राजकीय आखाडा रंगण्याची चित्र दिसून येत आहे .